हिरोशिमा (जपानी: 広島市) ही जपान देशाच्या हिरोशिमा प्रांताची राजधानी व चुगोकू प्रदेशामधील सर्वात मोठे शहर आहे.
हिरोशिमा शहरावर दुसऱ्या महायुद्धामध्ये परमाणूबाँबचा हल्ला झाला होता. दुसऱ्या महायुद्धाचा अंत लगेच होणार नाही याची कल्पना आल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमनने नवीनच तयार करण्यात आलेल्या परमाणु बॉम्बचा उपयोग जपानवर करायचे ठरवले. परमाणुबॉम्ब वापरल्यास युद्धांत लगेच होऊ शकेल असा अमेरिकेचा कयास होता. अमेरिकन युद्धसचिवाला देण्यात आलेल्या अंदाजानुसार जमिनीवर केलेल्या हल्ल्यात १४ ते ४० लाख अमेरिकन सैनिक मरण पावण्याची शक्यता होती. ऑगस्ट ६, इ.स. १९४५ रोजी एनोला गे नावाच्या बी.२९ प्रकारच्या विमानाने लिटल बॉय असे नामकरण केलेला परमाणु बॉम्ब हिरोशिमा शहरावर टाकला. यात हिरोशिमा बेचिराख झाले होते.
बाह्य दुवे