स्पेस शटल चॅलेंजर हे अमेरिकेचेअंतराळयान होते. हे यान पृथ्वीवर परत आणता येणारे होते. हे यान दुसऱ्या पिढीतले मानले जाते. चॅलेंजर ने ९ अंतराळ मोहीमा यशस्वीपणे पार पाडल्या. परंतु इ.स. १९८६ साली २८ जानेवारी रोजी एका अंतराळ मोहिमेत उड्डाणापासून ७३ सेकंदात यानाच्या अग्निबाणाचा स्फोट झाला. यात ६ अंतराळयात्री आणि एका शिक्षिकेचाही मृत्यु झाला.