स्कंदगुप्त

स्कंदगुप्त (म्रुत्यू इ.स. ४६७) हा कुमारगुप्ताचा पुत्र आणि गुप्त साम्राज्याचा उत्तराधिकारी होता. हा गुप्त साम्राज्यातील शेवटचा सम्राट मानला जातो व गुप्त साम्राज्याचे पतन याच्या काळात चालू झाले. स्कंदगुप्त हा इ.स. ४५५ ते इ.स. ४६७ पर्यंत गुप्त सामा्राज्याचा राजा होता. स्कंदगुप्तच्या काळात अनेक उठाव झाले जे शमवण्यात स्कंदगुप्तची कारकीर्द पणास लागली. पुष्यमित्र हा मध्य भारतातील एक गट होता ज्याने गुप्त साम्राज्या विरुद्ध उठाव केला. स्कंदगुप्तने हा उठाव यशस्वीपणे शमवला परंतु यानंतर वायव्य अशियातून आलेल्या हूण टोळ्यांचा स्कंदगुप्तला सामना करावा लागला. स्कंदगुप्त ने कुमारगुप्तच्या काळापासून हूणांचा सामना करून पराभव केला होता त्यामुळे त्याला सेनानी म्हणून चांगलीच प्रशंसा झाली होती. हूणांचे आक्रमण परतावून लावले परंतु पूर्ण नियंत्रण अवघड गेले. परंतु सातत्याच्या लढाया व उठावांमुळे गुप्त साम्राज्याला उतरती कळा लागली. अलाहाबाद येथील शिलालेखांमध्ये हरिसेन याने स्कंदगुप्तच्या कारकिर्दीचे वर्णन केले आहे.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!