सैंधव मीठ

सैंधव मीठ (Rock Salt) हा एक मिठाचा प्रकार आहे. यास शेंदेलोण/सेंधा नमक असेही म्हणतात. या मिठाशिवाय, साधे समुद्री मीठ (Common Salt), पादेलोण (Black Salt), बीडलवण, सांबारलोण (सांबार सरोवराजवळ मिळणारे मीठ)हे मिठाचे चार प्रकार आहेत. याचा संदर्भ आयुर्वेद आयुर्वेदात दिलेला आढळतो. सैंधव मीठ हे खाणीतून मिळते म्हणून ते खनिज मीठ आहे. सैंधव हे आरोग्यास हितकारक व त्रिदोषशामक असते, म्हणून चरकाचार्य सैंधवाला सर्वात श्रेष्ठ लवण (मीठ) असे म्हणतात. [] या मिठामध्ये लोह तत्त्वाचा आणि गंधकाचा अंश असतो. सैंधवाचा वापर उपवासाच्या पदार्थांमध्ये केला जातो. पचनशक्ती सुधारण्यासाठी आणि भूक वाढण्यासाठी हे मीठ उपयुक्त आहे. हे मीठ कफवर्धक नाही.[]

इतिहास

सुमारे पाचशे दशलक्ष वर्षांपूर्वी समुद्र आणि प्रस्तर भूखंड यातील घडामोडी होऊन समुद्राच्या काही भागात भूमी तयार होत गेली. येथील मीठ या भूमीवर तसेच राहिले. त्यावर या मिठामध्ये झिंक, लोह, मँगनीज, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम व इतर द्रव्यांचा परिणाम होत गेला. आणि यथावकाश भूगर्भात मिठागरे तयार झाली.

सैधव मिठाचे फायदे

सैंधव मीठ नाकाच्या हाडासाठी देखील उपयुक्त आहे

  • तणाव कमी करण्यासाठी सैंधव मिठाचे सेवन फायदेशीर ठरते.[]
  • सैंधव मीठ रेचक म्हणून पोटाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
  • सैंधव मिठाच्या पाण्याची वाफ श्वसनसंस्थेच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते.


  1. ^ "सहज आयुर्वेद – मीठ". Loksatta. 2020-04-24 रोजी पाहिले.
  2. ^ "आयुर्वेदानुसार मीठ निरनिराळ्या प्रकारचे, प्रत्येकाचे प्रभाव निराळे". Majha Paper. 2020-04-24 रोजी पाहिले.[permanent dead link]
  3. ^ "साध्या मिठाऐवजी करा सैंधव मिठाचा वापर". 24taas.com. 2020-04-24 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!