इ.स. १९५७ सालच्या आलिया भोगासी या मराठी चित्रपटाद्वारे सीमा देव यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी भूमिका साकारलेले आनंद, जगाच्या पाठीवर, मोलकरीण, यंदा कर्तव्य आहे, , या सुखांनो या, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला हे चित्रपट विशेष गाजले.
पुरस्कार
राजा परांजपे प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (पिफमधील) पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार. (२०१७)
मृत्यू
२४ ऑगस्ट २०२३ रोजी मुंबई येथे त्यांच्या राहत्या घरी उतार वयामुळे त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू समयी त्यांचे वय ८१ वर्षे होते.[२] मृत्यू पूर्वी त्या अल्झायमर आजाराने ग्रस्त होत्या.[३]
संदर्भ
^दिलीप ठाकुर. "सुवासिनी". 2011-05-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १६ जुलै, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)