सविता भावे

सविता रामकृष्ण भावे (जन्म : मळवली, १४ नोव्हेंबर१९३३; मृत्यू :१५ ऑक्टोबर २०१३) हे एक मराठी चरित्रलेखक होते. त्यांनी वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले. भावे यांनी तीसहून अधिक चरित्रे लिहिली.

मराठीतील अथश्री, उत्तररंग, प्रेरणा आणि योगक्षेम या वृद्धांसाठी असलेल्या मासिकांचे, त्रैमासिकांचे, षण्मासिकांचे, दिवाळी अंकांचे त्यांनी संपादन केले. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांची संघटना बांधण्यात मदत केली. त्यांच्या आत्मचरित्राचे नाव माणसांतला माणूस हे आहे.

साम्यवादी चळवळीत असलेल्या भावे यांनी नंतर सांस्कृतिक, शैक्षणिक कार्य केले. पुण्यातील इंडियन लॉ सोसायटी, फर्ग्युसन कॉलेज, रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटी यांच्याशी त्यांचा संबंध होता.

कौटुंबिक माहिती

भावे यांचा जन्म लोणावळ्याजवळच्या मळवली येथे झाला होता. शालेय शिक्षण पेणमध्ये, तर बी.ए.पर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन कॉलेजात झाले. पुण्याच्या लॉ कॉलेजातून ते एल्‌‍एल.बी झाले. त्यानंतर त्यांनी लाइफ इन्श्युरन्स कॉर्पोरेशनमध्ये नोकरी केली. विनोबा भावे हे सविता भावेंचे काका होत.

चरित्रे

अन्य पुस्तके

  • अक्षरप्रीत (आत्मकथन)
  • उत्साहपर्व (’उत्तररंग’ या षण्मासिकाच्या अंकांतील निवडक लेखांचा संग्रह)

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!