शारदा लिपी ही प्रामुख्याने काश्मीर प्रांतात वापरली जाणारी लिपी आहे. संस्कृत लिहिण्यासाठी शारदा लिपीचा वापर काश्मिरी पंडित करत असत. ही लिपी ब्राह्मी लिपीपासून विकसित झाली.
ह्या लिपीच्या नावाच्या उगमाबद्दल अनेक मान्यता आहेत. शारदा देवी ही काश्मीरची मूळ देवता असल्याने तिच्या नावाने ह्या लिपीला शारदा म्हणून ओळखतात.
सध्या वापरात असलेली गुरुमुखी लिपीचा विकास शारदा लिपीतून झाला आहे.
ही लिपी अन्य भारतीय लिपींंप्रमाणे डावीकडून उजवीकडे लिहितात. ह्या लिपीची वर्णमाला देवनागरीप्रमाणेच आहे. शारदा लिपीत ब्राह्मी लिपीप्रमाणे जोडाक्षरे एकाखाली एक लिहितात.
वर्णमाला
स्वर
स्वरचिन्हे
व्यंजने
युनिकोड
जानेवारी २०१२मध्ये युनिकोडच्या ६.१ आवृत्तीत शारदा लिपीलाही स्थान दिले गेले.
http://www.unicode.org/charts/PDF/U11180.pdf
संदर्भ
टिपा
ओझा, गौरीशंकर हीराचंद. प्राचीन भारतीय लिपिमाला (हिंदी भाषेत). २६ नोव्हेंबर २०१९ रोजी पाहिले.