वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामने खेळण्यासाठी जून २०२३ मध्ये संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला.[१][२][३] या मालिकेने दोन्ही बाजूंना २०२३ क्रिकेट विश्वचषक पात्रता पूर्व तयारीची संधी दिली.[४][५] मे २०२३ मध्ये, अमिराती क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) फिक्स्चरची पुष्टी केली.[६]
वेस्ट इंडीझने ४ गडी राखून विजय मिळवला शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह पंच: अकबर अली (यूएई) आणि अहसान रझा (पाकिस्तान) सामनावीर: केविन सिंक्लेअर (वेस्ट इंडीझ)
संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
एथन डिसोझा, मुहम्मद जवादुल्लाह (यूएई) आणि अलिक अथानाझे (वेस्ट इंडीज) या सर्वांनी वनडे पदार्पण केले.
नोंदी
^रोस्टन चेसने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीझचे नेतृत्व केले.