विल्यम पी. हॉबी विमानतळ तथा ह्युस्टन-हॉबी विमानतळ (आहसंवि: HOU, आप्रविको: KHOU, एफ.ए.ए. स्थळसूचक: HOU)हा अमेरिकेच्या ह्युस्टन शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहराच्या मध्यवर्ती भागापासून ११ किमी (७ मैल) अंतरावर असलेला हा विमानतळ ह्युस्टनमधील पहिला विमानतळ आहे.
ह्युस्टन आंतरखंडीय विमानतळाखालोखाल वर्दळ असलेला हा विमानतळ १९६९मध्ये आंतरखंडीय विमानतळ उघडल्यावर बंद करण्यात आला होता परंतु दोन वर्षांनी हा विमानतळ परत सुरू करण्यात आला. हा विमानतळ साउथवेस्ट एरलाइन्सचे मुख्य ठाणे असून अमेरिकेतील बव्हंश मोठ्या शहरांना येथून थेट विमानसेवा उपलब्ध आहे.