झाडांनी दाटलेल्या भागाला वन (इतर नावे: जंगल, रान ; इंग्लिश: Forest ;) असे म्हणतात. एकेकाळी पृथ्वीच्या भूपृष्ठाचा ५० % भाग व्यापणाऱ्या वनांनी वर्तमानात पृथ्वीच्या पृष्ठभागावरील ९.४ % भाग, अर्थात भूपृष्ठाचा ३० % भाग, व्यापला आहे. वनांमध्ये सजीवांना नैसर्गिक आश्रय लाभतो, तसेच वनांमुळे जलचक्राचे नियमन व भूपृष्ठाचे संरक्षण होते. जंगल आपल्या गरजा भागवतात उदा. लाकूड, औषधी वनस्पती.वन म्हणजे वृक्षांचे वर्चस्व असलेले मोठे क्षेत्र आहे.