वज्र

जपान येथील बौद्ध मठातील वज्र

हिंदूबौद्ध परंपरांनुसार वज्र (संस्कृत: वज्र ; चिनी: 金剛, चिंगांग ; तिबेटी: རྡོ་རྗེ། , तोर्जे ; जपानी: 金剛 ; दोक्को) हे एका प्रकारच्या शस्त्राचे नाव आहे. वस्तू म्हणून पाहता, हे हातात पकडता येण्याजोगे धातूचे शस्त्र असते. हिंदू, बौद्ध व जैन मतांनुसार वज्र हे आत्मबलाचे चिन्ह मानले जाते. बौद्ध धर्मविधींतील धार्मिक साहित्यसामग्रीत याला अविभाज्य स्थान आहे.

तसेच भारतात प्राचीन काळी व तिबेट, भूतान, थायलंड इत्यादी बौद्धमतप्रभावित देशांत वज्र हे पुरुषांसाठीचे व्यक्तिवाचक नाव म्हणूनही वापरण्याची रीत आहे.

सांस्कृतिक संदर्भ

हिंदू परंपरेतील संदर्भ

देवांचा राजा इंद्र याचे शस्त्र होते. महर्षि दधिची यांच्या त्यागामुळे वज्राची निर्मिती होऊ शकली. हे शस्त्र त्यांचा अस्थींपासून निर्मिले होते. या शस्त्राचा वापर करून इंद्राने वृत्राचा निप्पात केला; तसेच स्वर्गावरील अनेक आक्रमणे परतवून लावत युद्धे जिंकली.

चित्रदालन

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!