Longjam Thambou Singh (es); लाँगजाम थंबू सिंह (mr); Longjam Thambou Singh (en); Longjam Thambou Singh (nl); लाँगजाम थंबू सिंह (hi); Longjam Thambou Singh (ast) Politician from Manipur (en); मणिपूरचे राजकारणी (mr)
लाँगजाम थंबू सिंह हे मणिपूरचे राजकारणी होते जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षासोबत होते. ते १३ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर १९६७ ह्या अल्प काळासाठी राज्याचे मुख्यमंत्री होते.[१] १९६७ मध्ये ते केशमथोंग विधानसभा मतदारसंघातून ४,४८८ (३३.५४%) मते मिळवून विजयी झाले होते.[२]
१९६७ मणिपूर विधानसभा निवडणूकीनंतर काँग्रेसला ३० पैकी १६ जागा मिळाल्या होत्या. पण ७ अपक्ष नेत्यांच्या पाठिंब्याने मैरेंबाम कोइरेंग सिंह हे मार्च १९६७ मध्ये परत मुख्यमंत्री झाले. ऑक्टोबर १९६७ मध्ये ९ नेत्यांनी काँग्रेस सोडले वर मैरेंबाम यांचे सरकार संपले. लाँगजाम थंबू सिंहयांनी "मणिपूर युनायटेड फ्रंट" या नवाखाली राज्यातले पहिले युती सरकार बनवले. पण लगेच या युतीमधील एका राजकारण्याने आपला गट सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्या पाठोपाठ मणिपूर विधानसभेचे अध्यक्ष व उपअध्यक्ष यांनी राजीनामा दिला. नवे अध्यक्ष व उपअध्यक्ष निवडता न आल्याने सिंह यांचे सरकार बरखासत करून राष्ट्रपती राजवट लागू झाली.[३][४]
संदर्भ