लहान बगळा
|
शास्त्रीय नाव |
इग्रेटा गार्झेटा (Egretta garzetta) |
---|
कुळ |
बकाद्य |
---|
अन्य भाषांतील नावे |
---|
इंग्लिश |
लिटल इग्रेट (Little Egret) |
---|
संस्कृत |
बलाकिका |
---|
हिंदी |
करछिया बगुला |
---|
लहान बगळा ,छोटा बगळा किंवा मोरबगळा(शास्त्रीय नाव: Egretta garzetta ; इंग्लिश: Little Egret, लिटल इग्रेट) हा आकाराने लहान बगळा आहे. याचे वैष्यिष्ट्य म्हणजे हा दिसायला संपूर्णतः पांढरा असतो व याची चोच काळ्या रंगाची असते. विणीच्या हंगामात नर बगळ्याला मानेपाशी अत्यंत सुरेख तुरा येतो. गाय बगळा व लहान बगळा यांतला फरक ओळखणे अवघड असते. मुख्यत्वे चोचीच्या रंगावरून त्यांच्यामधला फरक ओळखता येतो. लहान बगळ्याची चोच काळी असते, तर गाय बगळ्याची चोच पिवळी असते.