रेवदंडा

रेवदंडा हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील गाव आहे. अलिबागपासून १७ किमी वर असलेले हे गाव रेवदंडा किल्ल्यात अंशतः वसलेले आहे. येथील समुद्रकिनाऱ्यावर काळ्या वाळूची पुळण आहे.कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे.[]

येथे ज्यू लोकांची वस्ती आहे. यांचे वंशज ७००हून अधिक वर्षांपूर्वी येथून जवळ नागाव येथे आले व या परिसरात वसले. हे लोक ज्यू धर्माच्या शिकवणीनुसार शनिवारी सॅबाथ पाळतात. यांचा भारतातील मूळ धंदा तेल्याचा होता. या दोन गोष्टींमुळे या परिसरातील ज्यू लोकांना शनिवार तेली असेही म्हणले जाते. रेवदंड्यातील बेथ एल सिनॅगॉग कोंकणी वास्तूशैलीत असून जगातील इतर सिनेगॉगपेक्षा वेगळा आहे.

येथून जवळ असलेल्या टेकडीवर दत्तमंदिर आहे. सुमारे १,५०० पायऱ्या असलेल्या या मंदिरात दत्तजयंतीपासून पाच दिवस उत्सव असतो.

ख्रिश्चन संत सेंट फ्रांसिस झेवियरने येथे आपल्या भारतातील पहिल्या काही उपदेशात्मक प्रवचनांपैकी (सर्मन) एक येथे दिल्याचे समजले जाते.

  ?रेवदंडा

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
Map

१८° ३३′ ००″ N, ७२° ५६′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर अलिबाग
जिल्हा रायगड जिल्हा
लोकसंख्या ९,००० (२०११)
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०२२०३
• +०२१४१
• एमएच/०६ पेण

रेवदंडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. समुद्र किनाऱ्यावरील वातावरण शांत असते

लोकजीवन

येथे मासेमारी , भात शेती , नारळ , सुपारी तसेच काही प्रमाणत पर्यटन यांच्या वर येथील लोक अवलंबून आहेत


प्रेक्षणीय स्थळे

रेवदंडा किल्ला

रेवदंडा बीच

रेवदंडा बीच

शितलादेवी मंदिर

मुखरी गणपती मंदिर

दत्त मंदिर ,

दत्त मंदिर ,भोवळे

रामेश्वर मंदिर

बिर्ला मंदिर , सालाव

काशीद बीच

सिद्धी विनायक मंदिर नांदगाव

कोर्लाई किल्ला

आक्षी स्तंभ

ज्यू धर्मीय सिनेगोंग

कोरलाई लाईट हाऊस आणि किल्ला फणसाड अभयारण्य


नागरी सुविधा

रेवदंडा येथे बाजार पेठ आहे तसेच हॉटेल , शाळा , कनिष्ठ महविद्यालय , बसस्थानक

संदर्भ

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/

हे सुद्धा पहा

  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, सोमवार,०४ एप्रिल २०२२

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!