ही भारतात नेपाळ इंडोनेशिया ( बाली) आणि हिमालयाच्या परिसरातील अन्य प्रदेशात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याच्या फळांपासून जपमाळ बनवितात. रुद्राक्षाचे एकमुखी, द्विमुखी, पंचमुखी, षण्मुखी, अष्टमुखी, चतुर्दशमुखी इत्यादी प्रकार आहेत.
रुद्राक्षाबद्दल काही समजुती
(रुद्राक्ष) धारण केला असता, रक्तदाब (Blood Pressure) व्यवस्थित राहतो, अशी मान्यता आहे.
मधुमेह असलेल्या व्यक्तीने रुद्राक्ष उगाळून ते चाटण मधासोबत सेवन करावे. रुद्राक्षाचे फळ हे शिवाच्या अश्रूपासून निर्माण झाले आहे असे मानले जाते. हे फळ एक दिव्य मणी असून त्याची पूजा केल्याने साक्षात शिवपूजेचे फळ मिळते. शिवलीलामृतामध्ये असे सांगितले आहे की सहस्र रुद्राक्षे धारण करणारा साक्षात शिव आहे. त्याचप्रमाणे १६ रुद्राक्षे दंडाभोवती बांधावीत, कपाळाला १ बांधावा, मनगटाभोवती १२, कंठाभोवती ३२, कानामध्ये ६, व अन्यत्र ७ अशा प्रकारे एकूण १०८ रुद्राक्षे धारण करावीत.
रुद्राक्ष हे बीज परंपरेनुसार हिंदू धर्मात (खास करून शैव लोकांमध्ये) प्रार्थनेसाठी वापरले जाते. हे बीज इलोकॅर्पस जेनिट्रस ही मुख्य प्रजाती असलेल्या जीनस इलोकॅर्पसमधील प्रचंड अशा सदाहरित रुंद पानांच्या अनेक प्रजातींद्वारे बनविले जाते. ते हिंदू देवता भगवान शंकराशी संबंधित आहेत आणि त्याच्या भक्तांद्वारे सामान्यपणे संरक्षणार्थ धारण केले जाते. या बिया भारतात आणि नेपाळमध्ये मणी म्हणून सेंद्रिय दागिने आणि माळांमध्ये वापरले जातात, आणि त्यांचे अर्ध-मूल्यवान खड्यांप्रमाणे मुल्यांकन केले जाते. खंडांच्या (मुख) विभिन्न संख्येनुसार मणींचे विविध अर्थ आणि शक्ति निर्धारित केले जातात आणि दुर्मिळ आणि अद्वितीय मणींना फार मोठी किंमत मिळते आणि ते मूल्यवान असतात.
महत्त्व
भारतात रुद्राक्ष मणी धारण करण्याची परंपरा फार पूर्वीपासून आहे, खास शैव लोकांमध्ये. याचे कारण भगवान शंकरांशी असलेला त्याचा संबंध आहे. भगवान शंकर स्वतः रुद्राक्ष माला धारण करीत असत. रुद्राक्षाच्या मणींचा वापर करीत ओम नमः शिवायचा जाप केला जातो.[१]
जरी त्यात खास असे कोणतेही प्रतिबंध नसले, तरी देखील महिलांमध्ये मोतींसारख्या इतर पदार्थांपासून बनविलेले मणी धारण करणे सामान्य आहे.
रुद्राक्षाचे मणी एकमेकात ओवून माला बनविली जाते आणि ख्रिश्चन लोकांमध्ये ज्या रीतीने जपमाळा वापरतात, त्याच रीतीने एखादे मंत्र किंवा प्रार्थना करताना मोजण्यासाठी वापरले जाते. बहुतेक माळांमध्ये १०८ मणी अधिक एक असतो, जिथे १०८ला पवित्र आणि एखाद्या लहान मंत्राचा पाठ करण्यासाठी योग्य मानले जाते. अतिरिक्त मणीला “मेरू”, “बिंदू” किंवा “गुरू मणी” असे म्हणले जाते, जे १०८ च्या चक्राच्या आरंभाचे आणि अंताचे चिन्ह असते आणि तसेच, एक “मुख्य” मणी म्हणून त्याचे प्रतीकात्मक मूल्य असते. असे मानले जाते की रुद्राक्ष मण्या हा पवित्र पदार्थ उच्चारीत मंत्रातील उर्जा पकडून ठेवतो आणि प्राथना करणाऱ्याच्या एकाग्रतेत आणि आध्यात्मिक विकासात मदत करतो.
व्युत्पत्ती
रुद्राक्ष हा मिश्र असा संस्कृत शब्द आहे, ज्यात रुद्र (शंकर) आणि अक्ष (“डोळ्यातील अश्रुचे थेंब”) हे सामील आहेत.[२][३]
मुखाची व्याख्या
संस्कृतमध्ये मुखी याचा अर्थ (“मुख”) म्हणजे (“चेहरा”) असा आहे. त्यामुळे मुखी याचा अर्थ रुद्राक्षावरील छिद्र, जसे एकमुखी रुद्राक्ष म्हणजे एक मुख किंवा छिद्र असलेले रुद्राक्ष, 4 मुखी रुद्राक्ष म्हणजे चार मुख किंवा छिद्ेु असलेले रुद्राक्ष.
आकार
आकार नेहमी मिलीमीटर्समध्ये मोजला जातो. ते मटरच्या बीजाइतक्या लहान आकारापासून काही अक्रोडच्या आकाराएवढे असतात.
पृष्ठभागावरील पोत
रुद्राक्षाचा पृष्ठभाग कठीण असावा आणि त्याच्यावरील खाचांच्या उंची आणि खोली व्यवस्थित असाव्यात, जे बहुतेक नेपाळी रुद्राक्षांमध्ये आढळते. इंडोनेशियाच्या रुद्राक्षाचे स्वरूप भिन्न असते. भारतातील रुद्राक्ष नसर्गिक पर्वत आणि दऱ्यांप्रमाणे अतिशय उंचवटे आणि खोली दर्शवितात.
चेहऱ्याचे स्वरूप/मुखाचे स्वरूप
सर्व ठिकाणांवरील अविकसित, नैसर्गिकरीत्या जुडलेल्या, अर्धवट बनलेल्या किंवा मुखे न बनलेल्या रुद्राक्षांची अनेक उदाहरणे आढळतात. पूर्णपणे विकसित मुख मोजण्यासाठी सर्वात सोपे असतात आणि त्यांच्या सामान्य बाजारपेठेच्या प्रमाणापेक्षा त्यांना जास्त मूल्य मिळते. अविकसित मुख, जुडलेले मुखे, अर्धवट बनलेली मुखे किंवा मुखे न बनलेले रुद्राक्ष व्यापाऱ्यांदरम्यान गोंधळ निर्माण करते आणि त्यामुळे रुद्राक्षाची किंमत मोठ्या प्रमाणावर बदलू शकते. रुद्राक्षाच्या मुखांना मोजण्याच्या पद्धतीचे वर्णन करण्यासाठी व्यापाऱ्यांकडे कोणतेही एक प्रमाण नाही आहे.
झाडाचे वर्णन
इलोकॅर्पस जेनिट्रस हे हिमालयाच्या पायथ्याशी गंगेच्या खोऱ्याच्या क्षेत्रात वाढते. तसेच ते दक्षिण पूर्व आशिया, नेपाळ, इंडोनेशिया, न्यू गिनी ते ऑस्ट्रेलिया, ग्वाम, आणि हवाईमध्ये सुद्धा आढळते.[४][५] रुद्राक्षाची बी पूर्णपणे पिकल्यावर निळ्या रंगाच्या बाहेरील कवचाने झाकलेले असते आणि त्यामुळे त्याला ब्ल्यूबेरी बीड्स असे देखील म्हणले जाते. निळा रंग पिग्मेंटमधून आलेला नसतो, तर त्याच्या संरचनेमुळे असतो.[६] हे सदाहरित झाड असते आणि पटकन वाढते.