राम ताकवले
|
Third vice chancellor of the Indira Gandhi National Open University
|
First vice chancellor of the Yashwantrao Chavan Maharashtra Open University
|
Chairman of the National Assessment & Accreditation Council
|
|
जन्म
|
११ एप्रिल, १९३३ (1933-04-11)
|
मृत्यू
|
१३ मे, २०२३ (वय ९०)
|
राम ग. ताकवले (११ एप्रिल, १९३३ - १३ मे, २०२३[१][२]) हे एक भारतीय शिक्षणतज्ज्ञ होते. हे १९७८ ते १९८४ दरम्यान पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते,[३] हे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू आणि राष्ट्रीय विद्यापीठाचे अध्यक्ष सुद्धा होते.[४]
प्रो ताकवले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू आहेत."मुक्त विद्यापीठाची" संकल्पना महाराष्ट्रात डॉ.ताकवले ह्यांनीच महाराष्ट्र शासनाकडे मांडून त्याचा पाठपुरावा केला.शरद पवार हे मुख्यमंत्री असताना मुक्त विद्यापीठाची संकल्पना शासनाने मान्य करून १ जुलै १९८९ ला विद्यापीठाची स्थापना केली, त्याच मुळे डॉ.ताकवले ह्यांना संस्थापक कुलगुरू म्हणून नेमणूक करण्यात आली.त्यानंतर डॉ ताकवले हे १९९५ मध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ,दिल्ली येथे कुलगुरू झाले.
संदर्भ