रविंद्र चव्हाण (२० सप्टेंबर, १९७०:कल्याण, महाराष्ट्र, भारत - ) हे महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आहेत. हे डोंबिवली मतदारसंघातून २००९, २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये विजयी झाले आहेत. [१] ते महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण, माहिती आणि तंत्रज्ञान, खाद्य आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि बंदरे या खात्यांचे राज्यमंत्री होते.
२०२२ साली स्थापन झालेल्या, एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री आहेत. सध्या त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण ही खाती देण्यात आलेली आहेत. [२]
संदर्भ