यांको टिप्सारेविच (सर्बियन: Јанко Типсаревић) हा एक सर्बियनटेनिसपटू आहे. २००२ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेल्या टिप्सारेविचने एप्रिल २०१२ मध्ये ए.टी.पी. जागतिक क्रमवारीमध्ये आठवा क्रमांक गाठला होता. टिप्सारेविचने आजवर २०१३ सालच्या चेन्नई ओपनसह ४ एकेरी अजिंक्यपदे मिळवली आहेत. तो नोव्हाक जोकोविच खालोखाल सर्बियाचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरुष टेनिस खेळाडू मानला जातो.