मॅकडोनेल डग्लस

मॅकडोनेल डग्लस ही एक अमेरिकन विमाने व अंतरिक्षप्रवासाशी निगडित साधने बनविणारी संरक्षण कंत्राटदार कंपनी होती. या कंपनीची रचना डग्लस एरक्राफ्ट कंपनी आणि मॅकडोनेल एरक्राफ्ट या दोन कंपन्यांच्या एकत्रीकरणाने १९६७मध्ये झाली. १९९७मध्ये बोईंगने ही कंपनी विकत घेतली. दरम्यानच्या तीस वर्षांत मॅकडोनेल डग्लसने डीसी-१० आणि एफ-१५ ईगल सारखी अनेक प्रवासी आणि लढाऊ विमानांची रचना आणि उत्पादन केले.

या कंपनीचे मुख्यालय सेंट लुइस लॅंबर्ट आंतरराष्ट्रीय विमानतळावर होते.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!