'कल्याण' पासून 'थीतबी' गावापर्यंत हा तालुका पसरला आहे. तालुक्यात प्रामुख्याने कुणबी, मराठा ,बौद्ध,आगरी, आदिवासी व ठाकुर समाजाची वस्ती आहे. अहमदनगर - मुंबई महामार्गावर गावे पसरलेली आहेत. पर्यटकप्रिय असलेला 'माळशेज घाट' याच तालुक्यामध्ये येतो. मुंबई व जवळपासच्या ठिकाणांहून छोट्या सहलींसाठी बरेच पर्यटक या परिसरात येतात.
मुरबाड तालुका हा निसर्गाने नटलेला असा तालुका आहे. या तालुक्यातील अनेक गावे ही डोंगराळ भागात मोडतात. मुरबाड परिसरात आज अनेक बंगलो प्रोजेक्ट आले आहेत. त्याच सोबत अनेक गृह प्रकल्प, उद्योग व्यवसाय येत आहेत. मात्र यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास व्हायला नको याची काळजी सर्वानी घ्यायला हवी.
मुरबाड तालुक्यातील काळू नदी आणि शाई नदीवर धरण बांधण्याचे नियोजन आहे . मात्र शासन आणि राजकारणी यांच्या चुकीच्या धोरणामुळे येथील स्थानिक बेघर आणि बेरोजगार होणार आहेत. स्थानिकांसाठी शासनाची कोणतीही ठोस योजना नसल्याने या दोन्ही धारणांसाठी स्थानिकांचा प्रखर विरोध आहे. आज या दोन्ही धरणांचे काम बंद पडले आहे. स्थानिकांच्या एकजुटीचा विजय झाला आहे.
मुरबाडची MIDC विशेष प्रसिद्ध होती. मात्र सोयीसुविधांच्या अभावामुळे, प्रशिक्षित कामगारांचा तुटवडा आणि उद्योगांचे स्थलांतर यामुळे आज MIDCचे चित्र काळवंडले आहे.
पर्यटन
मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटाजवळील मोरोशी गाव येथुन २ किमी. अंतरावर प्रसिद्ध भैरवगडचा किल्ला आहे. या किल्ल्यावर थंड पाण्याने भरलेला हौद गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी कोरीव पायरी आहेत. घोडा ठेवण्यासाठी कोरीव जागा, थंड हवेचे ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ताब्यात असलेल्या गडांपैकी हा एक मानला जातो. वर्षभर अनेक पर्यटक येथे येतात.
सह्याद्री डोंगर रांगांमध्ये आजोबाचा पर्वत (डोंगर) हे स्थळ देवस्थान आणि पर्यटन स्थळ म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. तालुक्याचे शेवटचे गाव वेळूक आणि आळवे येथून आपल्याला आजोबाच्या पर्वतावर जाण्यास मार्ग आहे.
मुरबाड तालुक्यात अनेक ऐतिहासिक ठिकाणे तसेच पुराणात नोंद घेण्यात आलेली ठिकाणे खालीलप्रमाणे आहेत.