मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान हे माल्टाच्या मार्सा शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
१८ ऑक्टोबर २०१९ रोजी २०१९-२० व्हॅल्लेटा चषक स्पर्धेद्वारे माल्टा आणि चेक प्रजासत्ताक या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.