मायामी गार्डन्स हे अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील एक शहर आहे. मायामी-डेड काउंटी मधील हे शहर मायामी शहराच्या मध्यवर्ती भागापासून २६ किमी (१६ मैल) उत्तरेस आहे[१]
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,११,६४० इतकी होती. श्यामवर्णीय अमेरिकन बहुमतात असलेले हे फ्लोरिडामधील सगळ्यात मेठे शहर आहे. येथील ६६.९७% लोक श्यामवर्णीय आहेत.
मायामी गार्डन्स मध्ये हे हार्ड रॉक स्टेडियम हे नॅशनल फुटबॉल लीगच्या मायामी डॉल्फिन संघाचे घरचे मैदान आहे. याशिवाय मायामी हरिकेन्स आणि मायामी विद्यापीठाचा फुटबॉल संघ याचा वापर करतात.
फुटबॉलशिवाय सनलाइफ स्टेडियम हे मेजर लीग बेसबॉलच्या फ्लोरिडा मार्लिन्स या संघाचे मैदानही या शहरात आहे.
संदर्भ