मदुराई

हा लेख मदुराई शहराविषयी आहे. मदुराई जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


  ?मदुराई

तमिळनाडू • भारत
टोपणनाव: मदुरै
—  शहर  —
मदुराईचे विहंगम दृश्य
मदुराईचे विहंगम दृश्य
मदुराईचे विहंगम दृश्य
Map

९° ५५′ १०.७८″ N, ७८° ०७′ ०९.८२″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा मदुराई
लोकसंख्या ९२८.८६९ (२००१)
महापौर तेनमोळी गोपीनादन (मदुराईच्या पहिल्या महिला महापौर)
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ६२५ ०xx
• +त्रुटि: "(९१)४५२" अयोग्य अंक आहे
• टी.एन.-५८, टी.एन.-५९ तसेच टी.एन.-६४
www.maduraicorporation.in

मदुराई (मराठीत मदुरा Madura), किंवा स्थानिक भाषेत मदुरै-मदुराई किंवा अनेकदा कूडल (कूडलनगर) ह्या नावाने प्रसिद्ध असणारे शहर. [तमिळ:மதுரை इतर उच्चार : मदुरै] भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे, तसेच मदुरा हे भारतीय उपखंडातील सर्वात जुने मानववस्ती असलेले ऐतिहासिक नगर म्हणून देखील ओळखले जाते. हे शहर मदुराई जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र असून तमिळनाडूतील ते तिसरे मोठे शहर आहे. या शहरास सुमारे २५०० वर्षांचा इतिहास आहे.

मदुरा हे वैगई ह्या नदीच्या काठी वसले आहे. मदुरैला देवळांचे महानगर (किंवा कूडल मानगर) असे संबोधले जाते. तसेच ते तमिळनाडू राज्याची सांस्कृतिक राजधानी (कलाच्चार तलैनगर) म्हणूनही प्रसिद्ध आहे. या शहराला मोगऱ्याचे नगर, तुंग मानगर (जागृत महानगर), पूर्वेकडील अथेन्स (Athens of the East) अशा नावांनीही ओळखले जाते.

पूर्वेतिहास

भाषा

मदुरा शहरात प्रामुख्याने तमिळ भाषा बोलली जाते. या तमिळ बोलीला विशेष महत्त्व आहे. इथली तमिळ ही कोंग तमिळ, नेल्लै तमिळ, रामनाड तमिळ आणि चेन्नै तमिळ ह्या बोलींपेक्षा वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथील तमिळ बोलीला तमिळनाडू राज्यात प्रमाण मानण्यात आले आहे. शहरात तमिळ सोबतच इंग्लिश भाषा, तेलुगू, गुजरातीउर्दू या भाषा काही प्रमाणात बोलल्या जातात. परंतु सर्वच भाषांवर तमिळचा प्रभाव दिसून येतो.

स्थापत्य व प्रमुख धार्मिक स्थळे

मीनाट्चीअम्मन कोविल/कोईल (मीनाक्षी मंदिर)

भगवान शंकर(सुंदरेश्वर) व पार्वती (मीनाक्षी) यांचे हे एक सुरेख असे धार्मिक स्थळ असून ते मीनाक्षी देवीच्या नावाने ओळखले जाते. मदुरा नगराची बांधणी ही प्रामुख्याने मीनाक्षी मंदिराच्या आजूबाजूने झाली आहे. एके काळी संपूर्ण नगराच्या मध्यस्थानी मीनाक्षी-सुंदरेश्वराचे देऊळ दिसत असे. हे मंदिर गोपुरम शैलीतील असून मंदिराला एकूण १४ गोपुरे आहेत. स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना असलेले हे देऊळ देशातील देवीच्या प्रमुख शक्तिपीठांपैकी एक आहे. हे १६व्या शतकातील बांधकाम असून, त्याचे क्षेत्रफळ ६५ हजार चौरस मीटर इतके आहे. हजार खांबाचा मंडप हे येथील प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे. मंदिरातील विशेष कोरीवकाम (मुख्य मंदिर तसेच सहस्त्रस्तंभ नटराज सभा) व चित्रकला हे खास आकर्षण आहे.

मीनाट्चीअम्मन कोविल -मीनाक्षी मंदिर, अजून एक चित्र

मदुरा नगराच्या केंद्रस्थानी असणारे हे भगवान विष्णूंचे एक अतिशय सुंदर देऊळ आहे. इथे विष्णू "अळगर"(अर्थ:सुंदरसा) ह्या नावाने ओळखले जातात. सुबक सुंदर कोरीवकाम, उत्सवाचा हत्ती आणि 'मरकतवल्ली' लक्ष्मी स्थान हे अतिशय प्रेक्षणीय आहेत्. हे विष्णूच्या १०८ दिव्यदेशम् अशा पवित्र स्थानांपैकी एक आहे. हे देऊळदेखील अतिशय प्राचीन असून हजारो भक्तगणांची येथे नेहमीच दाटी असते.

चित्रदालन

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!