भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (बी.एस.ई.: 500103, एन.एस.ई.: BHEL; संक्षेप: बी.एच.इ.एल.) ही भारत देशामधील एक सरकारी कंपनी आहे. देशामधील ७ महारत्न कंपन्यांपैकी एक असलेली बी.एच.इ.एल. वीजनिर्मिती केंद्रासाठी आवश्यक असलेल्या सर्व सामग्रीचे उत्पादन करते. अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये देखील बी.एच.इ.एल.ने मुसंडी मारली असून भारतामध्ये व जगभर अनेक नवे प्रकल्प उभारण्यात बी.एच.इ.एल. सहाय्य करते. १९६४ साली स्थापन झालेली बी.एच.इ.एल. १९७१ सालापासून सतत नफा कमवत आहे.
विद्युतनिर्मितीसाठी लागणारे सर्व प्रकारचे टर्बाईन, बॉयलर, स्वीचगियर इत्यादी बी.एच.इ.एल.ची प्रमुख उत्पादने आहेत. त्याच बरोबर बी.एच.इ.एल. भारतीय रेल्वेसाठी विद्युत इंजिने देखील बनवते.
प्रमुख उत्पादन केंद्रे
भारतामधील खालील शहरांमध्ये बी.एच.इ.एल.चे प्रमुख कारखाने आहेत.
बाह्य दुवे