भारतीय कला

भारतीय कलेमध्ये विविध कला प्रकार समाविष्ट आहेत. त्यामध्ये शिल्पकला, मुर्तीकारी, चित्रकला, विणकाम इ. कलांचा समावेश होतो. भौगोलिकरित्या ह्या कला संपूर्ण भारतीय उपखंडात पसरलेल्या आहेत ज्यात भारतासह, पाकिस्तान आणि बांगलादेशचा समावेश आहे.[]

नक्क्षीकारीचे उत्तम ज्ञान हे भारतीय कलेचे वैशिष्ट्य आहे आणि ते आपण प्राचीन तसेच आधुनिक प्रकारांमध्ये बघू शकतो.

यक्ष कंस आकृती. सांची येथील स्तूपाच्या पूर्व तोरणा येथील शिल्प, 1ले शतक इ.स.पू. - आजचे मध्य प्रदेश, भारत
पुरोहित-राजा हा ऐतिहासिक आणि सुप्रसिद्ध पुतळा. हा आजच्या पाकिस्तान येथील मोहेंजोदारो या कांस्ययुगीन शहराच्या उत्खननादरम्यान सापडलेला एक कोरीव पुतळा आहे.
बुद्ध, कुशाण कालखंड, इ.स.चे पहिले-दुसरे शतक, गांधार, आजचे पाकिस्तान: स्थायी बुद्ध (तोक्यो राष्ट्रीय संग्रहालय)
हिंदू देवतांच्या आणि इतर पौराणिक पात्रांच्या चित्रणातून, कालीघाट चित्रकला दैनंदिन जीवनातील अनेक चित्रणांसह विविध विषयांचे प्रतिबिंबित करते.
सारनाथ येथील अशोकस्तंभ, सुमारे २५० इसपू. सारनाथ संग्रहालय, वाराणसी जवळ, भारत

भारतीय कलेचा उगम इ.स.पु. ३००० पासून आपण बघू शकतो. आधुनिक कलेच्या प्रवासात त्यावर सांस्कृतिक (उदा. सिंधू आणि ग्रीक) तसेच धार्मिक प्रभाव जसे कि हिंदू, बुद्ध, जैन आणि मुस्लिम बघावयास मिळतो. असे हे धार्मिक परंपरांचे जातील मिश्रण असतांना सुद्धा प्रचलित कलात्मक शैलीचा मोठ्या धार्मिक संघांनी आदर केला.[]

प्राचीन कलेमध्ये दगड तसेच धातूचे शिल्प, विशेषतः धार्मिक शिल्प भारतीय वातावरणाचा सामना करत इतर प्रकारच्या शिल्पांपेक्षा अजूनही उत्तम स्थितीत आहेत.

भारतीय कलेचा संदर्भिक इतिहास

मंदिरांची कला

हडप्पा संस्कृतीचा अस्त आणि मौर्य साम्राज्यांपासून सुरू झालेल्या निश्चित इतिहास काळाची सुरुवात यामधला काळ विस्मरणात गेला आहे आणि इतिहासातील प्रमुख कलात्मक स्मारकांवर प्रभाव टाकणारा सर्वात पहिला धर्म हिंदू धर्म आहे.[] जरी लाकडांपासून बनवलेली काही प्राचीन स्मारके नंतर दगडाची केली गेली असली तरी त्याचा पुस्तकी संदर्भ सोडला तर कुठलाही भौतिक पुरावा सापडलेला नाहीये. भारतीय कलेमध्ये हे सतत निदर्शनास आले आहे कि विविध धर्म एका विशिष्ट कालखंडात आणि ठिकाणी जवळपास सारखीच कलाशैलीचा वापर करतात.[] कदाचित सारखेच कलाकार त्यांच्या धर्माव्यतिरिक्त इतरही धर्मांसाठी काम करत असतील.

लोक कला आणि आदिवासी कला

भारतात लोक आणि आदिवासी कलेचे विविध रूपे आहेत; कुंभारकाम, चित्रकारी, धातुकाम , कागद कला, विणकाम, आभूषणे बनविणे, खेळणे बनविणे इ. ह्या फक्त शोभेच्या गोष्टी नसून लोकांच्या जीवनात त्यांचे विशेष महत्त्व आहे आणि त्या त्यांच्या परंपरा आणि विधींशी जोडलेल्या आहेत.[]

विविध सामाजिक संगठना तसेच भारत सरकार ह्या कलांना जपण्यासाठी प्रयत्नशील आहे. ह्या कलांचा अभ्यास करण्यासाठी जागतिक स्तरावरील स्कॉलरशिप उपलब्ध आहेत.

संदर्भ

  1. ^ "लिस्ट ऑफ इंडियन साईट्स कॉंटनिंग ॲंसिएंट ॲंड मेडिएवल केव्ह पैंटिंग्स".
  2. ^ "आर्ट ऑफ इंडिया".
  3. ^ "हरप्पन कल्चर - आर्ट ॲंड क्राफ्ट्स".
  4. ^ "इंडियन रॉक आर्ट - प्रीहिस्टोरिक पैंटिंग्स ऑफ दि पंचमारही हिल्स".
  5. ^ "ढोकरा आर्ट: आर्टतेफॅक्टस फ्रॉम दि मेटलस्मिथ्स ऑफ वेस्ट बंगाल".

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!