प्राचीन भारतीय पुराणांनुसार ब्रह्मास्त्राची निर्मिती भगवान ब्रह्मदेव यांनी केली. ब्रह्मास्त्र हे या ब्रह्मांडामधील प्रत्येक जीवित अथवा मृत गोष्टीला नष्ट करू शकते. ज्या ठिकाणी ब्रह्मास्त्र पडते त्या ठिकाणासून अनेक मैलांपर्यंत याचा प्रभाव बनून राहतो. पुराणांमध्ये सांगितले आहे की, ब्रह्मास्त्र पडलेल्या ठिकाणी गवताचे पातेसुद्धा उरत नाही. ब्रह्मास्त्र आपला प्रभाव यानंतर अनेक वर्षे चालू ठेवते, अन् या प्रभावात ते ठिकाण वाळवंट बनते. [१].
महाभारत युद्धामध्ये कर्ण, अर्जुन, भीष्म, द्रोणाचार्य, अश्वथामा यांच्याजवळ ब्रह्मास्त्र होते[१]. रामायणामध्ये भगवान श्रीराम अाणी इंद्रजित यांच्याकडे ब्ह्मास्त्र होते.[१]
संदर्भ