बौद्ध धर्माचा उदय व विकास

बौद्ध धर्माचा उदय व विकास:-

वैचारिक व राजकीय पार्श्वभूमी

इहलोकी भौतिक सुखाने समृद्ध जीवन आणि परलोकी स्वर्गप्राप्ती या दोहोंच्या साधनेसाठी वैदिकांनी यज्ञसंस्था उभारली होती. परंतु कालांतराने ती अतिरेकी कर्मकांड व हिंसा यांत गुरफटली जाऊन समाजाला अप्रिय वाटू लागली. या मार्गांनी स्वर्गप्राप्तीसाठी धडपडणारे पंडित हे अंधारतून जाणारे आंधळे आहेत, असे उपनिषद्‌कारांनी रोखठोक बजावले व प्रत्येक व्यक्तीने आत्मा व परमात्मा यांचे स्वरूप ओळखून मोक्ष साध्यासाठी प्रयत्‍न करावा, या कल्पनेचा पुरस्कार केला. उपनिषदनाचे तत्त्वज्ञान माणसाला अनाकलनीय व माणसाला आवाक्याबाहेरचे वाटले, यातच संन्यास व भोगवाद, कर्मवाद व अक्रियवाद, ज्ञानवाद, गूढवाद व अज्ञेयवाद अशा विविध वादांमुळे सामन्यजनांचाच नव्हे, तर मोठमोठ्यांचाही बुद्धिभेद झाल्यामुळे भारतात वैचारिक अराजक निर्माण झाले.

राजकीय क्षेत्रात सार्वभौम सत्तेचा अभाव असल्यामुळे अवंती, कोशल, मगधासारख्या वैराने धुमसणा‍ऱ्या राज्यांनी आपापल्यातील वितुष्टांनी युद्धाचा वणवा सतत प्रज्वलित ठेवला होता. शाक्यमल्लांनी गणराज्यात बेदिली व गटबाजी माजवली होती. अशा प्रत्येकी अव्यवस्था, अशाश्वती व अस्वस्थता यांनी प्रत्येक क्षेत्र व्यापले होते. अशा परिस्थितीत आसक्तीपूर्ण प्रवृत्तिवादाला विसर्जित करणारा व विश्वप्रेमाने प्रेरित झालेला प्रवृत्तिवादाला उत्तेजन देणारा निवृत्तिवाद बुद्धाने मांडला.

गौतम बुद्धाचे जीवनचरित्र

नेपाळच्या दक्षिण सरहद्दीवर असलेल्या रोहिणी नदीच्या काठी कपिलवस्तू नावाचे शहर होते. तेथे शाक्य घराण्याच्या शुद्धोदन नावाचा राजा राज्य करीत होता. त्याच्या राणीचे नाव महामाया. त्यांना जो पुत्र झाला ( इ.स.पूर्व ५६३ ) त्याचे नाव सिद्धार्थ. त्‍याचा जन्म झाल्यानंतर यांची आई महामाया सातव्या दिवशी वारली. नंतर तिची बहीण व सवत महाप्रजापती गौतमी हिने सिद्धार्थाचे पालनपोषण केले. म्हणून त्याचे नाव गौतम झाले. बालपणापासूनच सिद्धार्थ काहीसा विरक्त होता. या विरिक्त मुलाकडे पाहून त्याच्या आईबापांना अत्यंत दुःख होत असे. त्यामुळे त्यांनी सिद्धार्धला अतिशय लाडात वाढविले. त्याच्यासाठी सर्व सोयीनी युक्त असा एक सुंदर राजवाडा बांधून देण्यात आला व तेथे कोणत्याही प्रकारची दुःखे त्याच्याजवळ येणार नाहीत, अशी व्यवस्था करण्यात आली. यशोधरा नामक सुंद्र राजकन्येशी त्यांचा विवाह झाला. पुढे त्यांना मुलगा झाला त्याचे नाव राहुल. वयाच्या २८ व्या वर्षापर्यंत सिद्धार्थ याप्रमाणे सुखोपभोगात जीवन घालवीत होता.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!