बारा ऑलिंपियन दैवते हे ग्रीक दंतकथेनुसार ऑलिंपस पर्वतावर राहणारी प्रमुख दैवते आहेत. रोमन दंतकथेनुसारसुद्धा असेच प्रमुख बारा दैवते आहेत. यामध्ये खालील दैवते समाविष्ट आहेत.
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.
विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत अनुसार काही अपवाद वगळता लेख शीर्षके मराठीतच असणे अभिप्रेत आहे .
एकूण लेख संख्येच्या अंदाजे २% पेक्षा अधिक लेख भाषांतर प्रतिक्षेत (इंग्रजी मसुद्याच्या स्वरूपात) असू नयेत असा संकेत आहे.
स्वतःच्या संपादन संख्येच्या २% पेक्षा अधिक लेखात मसुदे परभाषेत चिटकवू नयेत.
ऑलिंपियन दैवतांची यादी
ग्रीक नाव
रोमन नाव
पुतळा
कशाचा/कशाची देव/देवता ?
पिढी
झ्यूस
ज्युपिटर
देवांचा राजा आणि ऑलिंपस पर्वताचा अधिपती; आकाश, वादळ(वीज) व न्याय यांचा देव
पहिली
हीरा
ज्युनो
देवांची व स्वर्गाची राणी; स्त्रीत्व, गृहस्थी व मातृत्वाची अधिष्ठात्री.
पहिली
पोसायडन
नेपच्यून
समुद्राचा अधिपती; समुद्राचा व भूकंपाचा देव; घोड्यांचा निर्माता
पहिली
डीमिटर
सेरेस
सुपीकता, शेती, निसर्ग व ऋतू यांची देवता
पहिली
हेस्तिया
व्हेस्टा
चूल व घर यांची देवता (left so Dionysus could be in the twelve).
पहिली
ॲफ्रोडाइटी
व्हीनस
प्रेमाची, सौंदर्याची, कामनेची व प्रजननक्षमतेची देवता
दुसरी
अपोलो
अपोलो
सूर्यदेव तसेच प्रकाश, रोगमुक्ती, संगीत, कविता, भविष्यकथन, धनुर्विद्या व सत्य यांचा देव.
दुसरी
ॲरीस
मार्स
युद्ध, उन्माद, द्वेष आणि रक्तपाताचा देव.
दुसरी
आर्टेमिस
डायना
शिकार, चंद्र तसेच कौमार्यतेची देवता
दुसरी
अथेना
मिनर्व्हा
बुद्धी, कारागिरी व युद्धाची व्यूहरचना यांची देवता.
दुसरी
हिफॅस्टस
व्हल्कन
देवांचा लोहार; आगीचा व लोहाराच्या भट्टीचा देव.
दुसरी
हर्मीस
मर्क्युरी
देवांचा दूत; व्यापार, गती, चोर व खरेदी-विक्री यांचा देव.
दुसरी
ऑलिंपियन दैवतांच्या निकटदेवता
बिआ - हिंसेचे प्रतीक किंवा हिंसेचे मूर्तरूप असलेली देवता.
क्रेटॉस - सामर्थ्याचे मूर्तरूप.
दिओने - ॲफ्रोडायटीची आई.
डायनिसस - वाईन , मेजवान्यांचा, आणि आनंदाचा देव. हा बाकस या नावानेसुद्धा ओळखला जातो. (हेस्तिया ऑलिंपस पर्वत सोडून गेल्यावर याचा बारा ऑलिंपियन दैवतांमध्ये समावेश झाला.)
ऐलीथिया - झ्यूसपत्नी ज्युनो(हीरा)च्या कन्यका; प्रसूतिदेवता.
इऑस - पहाटेचे मूर्तरूप.
एरिस - मतभेदांची देवता.
इरॉस - इच्छा व वासना यांचा देव. रोमन देव क्यूपिड व हा एकसारखेच आहेत.
गॅनिमीड - ऑलिंपस पर्वतावरील राजवाड्यातील देवांचा सेवक.
हेडीस - मृतांचा अधिपती; पाताळभूमीचा आणि पृथ्वीच्या पोटातील संपत्तीचा (रत्न व मौल्यवान धातू यांचा) देव.
हीब - तारुण्यदेवता.
हेलियोस - टायटन; मनुष्यरूपातील सूर्य.
हेराक्लेस - हर्क्युलीस(झ्यूसचा पुत्र), ग्रीक पुराणांतील सर्वात महान बलवान आणि शूर नायक (Greatest hero of the Greek myths ).
होरे - ऑलिंपसचे रक्षक.
आयरिस - ऑलिंपसी दूत, मानवीस्वरूपातील इंद्रधनुष्य.
लेटो - झ्यूसची एक पत्नी; एका टायटनची कन्या; किअस टायटन व फीबी हिचे आईवडील; अपोलो व आर्तेमिस(डायना)ची आई.
मॉर्फियुस - स्वप्नदेवता.
म्यूझ - झ्यूसच्या नऊ कन्यका; काव्य, गान, नृत्य, वगैरेंच्या अधिष्ठात्या देवता; स्फूर्तिदेवता.
नेमेसिस - ग्रीक सूडदेवता.
नाइकी - विजयाची देवता.
पॅन - जंगल, गुराखी, वन्यपशू आणि निसर्गांचा देव.
पेएन - धन्वंतरी .
पेर्सेयस - झ्यूसचा पुत्र - ग्रीक पुराणांतल्या महान नायकांपैकी एक.
पेर्सेफोन - वसंतऋतू आणि मृत्युची देवता. डिमीटरची मुलगी.
सेलेने - मानवी स्वरूपातील चंद्र.
झेलस - नकलाकार देवता.