आयर्लंड महिला संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा
क्लेअर शिलिंग्टन (२६)
फरजाना हक (२४)
सर्वाधिक बळी
लुसी ओ'रेली (२)
खदिजा तुळ कुबरा (३)
बांगलादेश राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने सप्टेंबर २०१६ मध्ये आयरिश संघाविरुद्ध दोन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि दोन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) मालिकेसाठी आयर्लंडचा दौरा केला.[१][२][३] सर्व सामने टायरोन येथील ब्रेडी क्रिकेट क्लबमध्ये झाले.
५ आणि ६ सप्टेंबरला अनुक्रमे टी२०आ, त्यानंतर ८ आणि १० सप्टेंबरला एकदिवसीय सामने आयोजित करण्यात आले होते. बांगलादेशचा संघ कर्णधार सलमा खातूनशिवाय होता.[४] पहिला सामना वाहून गेल्यानंतर मालिकेत तिसरा वनडे जोडला गेला.[५]