फ्रांसिस बेकन

फ्रांसिस बेकन

इंग्लिश लेखक फ्रांसिस बेकन (१५६१ - १६२६) हे सर निकोलस बेकन यांचे आठवे अपत्य. सर निकोलस इंग्लंडची महाराणी एलिझाबेथचे ऑर्डर्ली होते. त्यामुळे सर्व कुटुंबियांचे थेट राजघराण्याशी संबंध होते. फ्रांसीस बेकन लहानपणापासून अतिशय हुशार होते. ते केंब्रीजच्या ट्रिनीटीचे विद्यार्थी पदवी संपादन केल्यानंतर १५७६ मध्ये त्यांनी कायद्याच्या पदवीसाठी ग्रेज इन येथे प्रवेश घेतला. पण वडिलांच्या अकाली निधनामुळे त्यांना शिक्षण सोडावे लागले. बेकन यांनी पुन्हा प्रयत्न केला आणि ते बॅरिस्टर झाले. राजघराण्याशी जवळचे संबंध असल्याने बेकन यशाच्या पायऱ्या फार वेगाने चढत गेले. आधी ते Utter Barrister [मराठी शब्द सुचवा](१५८२) झाले, पुढे Bencher [मराठी शब्द सुचवा](१५८६), मग Reader [मराठी शब्द सुचवा](१५८८) आणि Double Reader (१६००) व्हायला त्यांना जास्त वेळ लागला नाही. दरम्यान १५८४ साली ते खासदार झाले. राजघराण्याशी असलेली जवळीक अजून वाढली. त्या आधारावरच बेकन यांनी थेट महाराणीला उपदेश देणे सुरू केले. हे मात्र अनेकांना रुचले नाही. बेकन यांना आपल्या पदावरून पाय उतार व्हावे लागले.

पुढील राजे जेम्स प्रथम यांनी मात्र बेकन यांना आधी Soliciter General (१६०७) म्हणून नेमले, नंतर Attorney General (१६१३), पुढे बेकन यांची Lord Chancelleor[मराठी शब्द सुचवा] म्हणून नियुक्ती झाली (१६१८) तर Viscount[मराठी शब्द सुचवा] of St. Albans (१६२१) म्हणून ते रुजू झाले. आपल्या कार्यालयीन कामाचा मोबदला म्हणून त्यांनी लोकांकडून लाच स्वीकारली असल्याचे त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आल्याने १६२१ साली उच्च न्यायालयाने बेकन यांना (१) ४०,००० पाऊण्डचा दंड, (२) राजांच्या मनात येईल तेवढ्या दिवसांची कैद, (३) इंग्लंडच्या राजांची सत्ता जेथे कुठे असेल त्या सर्व ठिकाणी, आयुष्यभर कोण्त्याही सरकारी पदावर पुन्हा नियुक्ती न होणे, (४) लोक सभागृह आणि न्यायाल्याच्या परिसरात जन्मभर पाय न ठेवणे अशी शिक्षा ठोठावली.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!