प्रिया मराठे (जन्म:ठाणे, २३ एप्रिल १९८७) ही एक मराठी अभिनेत्री आहे. 'या सुखांनो या' (२००६) ह्या मराठी दूरचित्रवाहिनी मालिकेत तिने भूमिका करून आपल्या अभिनयास सुरुवात केली.[१]
त्या नंतर विविध मराठी आणि हिंदी मालिका, 'कसम से', 'पवित्र रिश्ता', 'बडे अच्छे लगते है', 'चार दिवस सासूचे', 'तू तिथे मी', 'कॉमेडी सर्कस' इत्यादीत त्यांनी काम केले. त्याच सोबत मराठी चित्रपट 'विघ्नहर्ता महागणपती' (२०१६) आणि 'किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी' (२०१६) मध्येपण त्यांनी काम केले. [२] [३]
वैवाहिक जीवन
प्रिया मराठे यांनी श्रीकांत मोघे यांचा मुलगा शंतनू मोघे सोबत २४ एप्रिल २०१२ रोजी लग्न केले[४]
संदर्भ