पुरा हे नाव बालीमधील हिंदू मंदिरांना दिले आहे [१]. हे इंडोनेशियामधील बाली मधील हिंदू धर्माच्या अनुयायांचे प्रार्थना करण्याचे स्थान आहे. पुरा बालीच्या वास्तुकलेतील नियम, शैली, मार्गदर्शन आणि अनुष्ठानानुसार बनवण्यात आलेले आहे. बसाकीहचे मातृ मंदिर बालीतील सर्वात मोठे आणि सर्वात पवित्र मंदिर मानले जाते.[२] बालीमध्ये मोठ्या संख्येने पुरा बांधले आहेत, त्यामुळे याला "हजार पुरांचे बेट" असेही नाव देण्यात आले आहे.
उगम
पुरा हा शब्द संस्कृत शब्दापासून उगम पावलेला आहे. याचा अर्थ "शहर", "भिंतीने वेढलेले शहर" किंवा "महल" असा आहे. बालीनीज भाषेच्या विकासा दरम्यान पुरा या शब्दाचा अर्थ धार्मिक मंदिर असा झाला. पुरी या शब्दाचा अर्थ महल किंवा राजा व सरदारांचे निवासस्थान असा झाला
रचना आणि आराखडा
भारतीय उपमहाद्वीपच्या भव्य हिंदू मंदिरांपेशा वेगळी अशी "पुरा"ची रचना आहे. "पुरा" मध्ये पूजा करण्याच्या जागा खुल्या आहेत पण भिंतींनी वेढलेल्या आहेत. हे सर्व सुंदर रीत्या सजावलेल्या दरवाजांनी जोडलेले असतात. या भिंतींच्या कंपाऊंडमध्ये अनेक पवित्र जागा, मेरू (टॉवर) आणि बले (पॅव्हेलियन) असतात. पुराची रचना, योजना आणि मांडणी बालीच्या त्रिमंडल संकल्पनांचे अनुसरण करते.[३] तीन मंडल मांडणी मध्ये प्रत्येक क्षेत्र त्याच्या पवित्र पदानुक्रमाच्या अनुसार मांडले जातात:
निस्त मंडल (जबा पिसन) - सर्वात बाह्य क्षेत्र, जे बाह्य परिसर आणि मंदिराचा सुरुवातीचा भाग यात असते. मंदीराच्या प्रवेशद्वारातून याच भागात थेट प्रवेश होतो. हे क्षेत्र सहसा खुल्या बागेसारखे असते. हा भाग धार्मिक नृत्यांसाठी वापरला जातो. धार्मिक उत्सवांच्या दरम्यान तयारीसाठी अतिरिक्त जागा म्हणून हा भाग वापरतात.
मध्य मंडल (जबा तेंगह) - हे मंदीराचे मध्य क्षेत्र आहे. या भागात भक्तांच्या धार्मिक विधि घडतात. या विभागात सामान्यतः अनेक मंडप तयार केले जातात. उदा. कलकुल (लाकडी ड्रम टॉवर), बालेगॅंग (गामलन मंडप ), व्हॅनिलन (भेट मंडप ), बेल पॅसेन्डेन आणि बेल पॅरेंटेनन, मंदिरातील स्वयंपाकघर.
उत्तरा मंडल (जेरो) - पुरा मधील सर्वात पवित्र क्षेत्र मानले जाते. हा भाग बंदिस्त आणि उंच असतो. यात पद्मसंगन, अचिंत्य (सांग हयांग विधही वासा, किंवा आधुनिक बालिनीजमधील "सर्व-एक-देव"), पिंगगिह मेरु (अ मल्टी टायर्ड टॉवर-ट्रीट) आणि ब्लेड पायवेदान (वैदिक चिंतन पॅव्हेलिओन), बेल पियासन, बेल पेपीलिक (ऑफर पॅव्हेलिओन), बेल पॅंगगुनन, बेले ह्यु, आणि गेडोंग पेनिम्पेनॅन (मंदिरांच्या अवशेषांचे स्टोअरहाउस) असे अनेक मंडप असतात.
दोन बाह्य क्षेत्र, निस्त मंडल आणि मध्य मंडलम् यांच्या व्यवस्थेचे (आराखड्यांचे) नियम थोडे लवचिक आहेत. बाले कलकुल सारखे अनेक मंडप, बाह्य मंडल (निस्त मंडल)च्या कोपऱ्यावर बनवल्या जाऊ शकतात. तसेच परंतान (मंदिरांचे स्वयंपाकघर) निस्त मंडलामध्ये बनवले जाउ शकते.
दरवाजे
बालीनी वास्तुकलामध्ये दोन प्रकारचे दरवाजे आहेत.
कांदी बेंटर म्हणून ओळखले जाणारे विभाजन गेट
पडूूरक्ष किंवा कोरि अगंग म्हणून ओळखले जाणारे छत असणारे टॉवर गेट
बालीनी वास्तुकलेतील रचनेमध्ये दोन्ही प्रकारच्या दरवाजांची विशिष्ट भूमिका असते. कांदी बेंटर निस्त मंडलामध्ये वापरला जाणारा दरवाजा आहे. कोरी अगंग दरवाजा मध्य मंडल आणि उत्तरा मंडलाच्या मधल्या भिंतीमध्ये वापरले जाते. दरवाजांच्या प्रकारांचे नियम हे पुरी, उच्चकुलीन आणि राजांच्या घरासाठी लागू होतात.
"पुरा"चे प्रकार
पुराचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक प्रकार बालीनी धार्मिक विधींसाठी बनवलेले आहेत. बालिनी मंदिरे बालीनी लोकांच्या शारीरिक आणि आध्यात्मिक गरजेनुसार बनवली जातात. ते सर्व कि काज-केलोद पवित्र ध्रुवाशी संबंधित आहेत. ही एक काल्पनिक रेखा आहे जी पर्वतापासून सुरू होऊन, मध्यवर्ती उपजाऊ मैदानातून, समुद्राला जाउन मिळते.
पुरा कह्यांग जग
पुरा तिर्त
पुरा देसा
पुरा पुसेह
पुरा दलम
पुरा मिर्जपाटी
पुरा सेगारा
साद कहयंगन
बालीवरील सहा पवित्र स्थान आहेत.[४] बालिनी विश्वासांनुसार ते बेटांचे मुख्य जागा आहेत आणि ते बालीला आध्यात्मिक संतुलन प्रदान करतात. या सर्वात पवित्र स्थानांची संख्या नेहमीच सहा पर्यंत असते.
संदर्भ
^"Temples in Bali". Bali Directory. 2010-05-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-07-21 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)