पी. आर. थिलागम (जन्म 1926)किंवा थिरुवरुर थिलागम, ह्या भारतीय संगीतकार आणि गायिका आहेत. तसेच त्या कुरावंजी(जे भारताच्या तामिळनाडू राज्यात लोकप्रिय असलेल्या नृत्य नाटकाचा एक पारंपारिक प्रकार आहे.)च्या प्रवर्तिका म्हणून ज्ञात आहेत. [१] [२] त्या इसाई वेल्लालार समुदायाच्याकोंडी परंपरेतील (कोंडी वारसा) आहेत. हा समुदाय त्यागराज मंदिर, तिरुवरूर येथे पूजा करण्यासाठी समर्पित महिलांचा पंथ आहे. [३]
थिलागम यांचा जन्म 1926 मध्ये तामिळनाडूमधील तिरुवरूर येथे त्यागराज मंदिरासाठी माहीत असलेल्या कोंडी देवदासींपैकी शेवटच्या नर्तकांच्या कुटुंबात झाला. [४] त्यांच्या आजी, कमलांबल ह्या नृत्य नाटकातील उल्लेखनीय कलाकार होत्या. त्यांच्याकडून कुरावंजी शिकून त्यांनी सार्वजनिक कार्यक्रम सुरू केले[५] आणि भारत व परदेशात अनेक ठिकाणी सादरीकरण केले. [६] त्यांना 1997 चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे. [७] [८] भारत सरकारने त्यांना 2007 मध्ये कलेतील योगदानाबद्दल पद्मश्री हा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला. [९] त्यांच्या कामगिरीचे इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स (IGNCA) द्वारे व्हिडिओ-दस्तऐवजीकरण केले गेले आहे. [५] तर त्यांची जीवनकथा मद्रास सीझन: इट्स जेनेसिस या नियतकालिकाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. ते नियतकालिक श्रुती(एक परफॉर्मिंग आर्ट्ससाठी समर्पित मासिक)ने प्रकाशित केले आहे. [१०]
हे सुद्धा पहा
- इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स
संदर्भ
साचा:Padma Shri Award Recipients in Art