न्यू झीलंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९७२ दरम्यान तीन महिला कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. न्यू झीलंडच्या महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे माउरीन पेन हिने नेतृत्व केले. कसोटी मालिका न्यू झीलंड महिलांनी १-० अशी जिंकली. ह्या मालिकेनंतर दक्षिण आफ्रिका महिलांनी थेट १९९७ मध्ये आंतरराष्ट्रीय सामना खेळला.
सराव सामने
महिला कसोटी मालिका चालु असतानाच मध्ये न्यू झीलंड महिलांनी ६ सराव सामने खेळले ज्यातले ३ सामने जिंकण्यात न्यू झीलंड महिलांना यश आले तर ३ सामने अनिर्णित राहिले.