ना.वि. कुलकर्णी

नारायण विनायक कुलकर्णी (जन्म : २७ जुलै, इ.स. १८९२; - १८ जानेवारी इ.स. १९४८) हे एक मराठी नाटककार होते. त्यांनी नट आणि नाट्यलेखक या दोनही भूमिकाद्वारे रंगभूमीवर काम केले. आपल्या एकूण कार्यासाठी त्यांनी शब्दांना प्राधान्य दिले. आपले मनातले विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचे शब्द हे आदर्श माध्यम आहे यावर त्यांचा विश्वास होता.

घरची गरिबी असल्याने ना.वि. कुलकर्णींचे शिक्षण मोठ्या कष्टांनेच झाले. मंगल भुवन व सं.नवीन कल्पना ही नाटके लिहिल्यानंतर संत कान्होपात्रा लिहिले, ते त्यातील भजन व अभंगामुळे खूपच लोकप्रिय ठरले. त्यांनी नाटकांबरोबरच कथा, कादंबरी लेखनही केले. कुलकर्णी हे ’महाराष्ट्र कुटुंब माले’चे संपादक होते. अयोध्येचा राजा या पहिल्या मराठी बोलपटाचे संवाद लेखन ना.वि. कुलकर्ण्यांचे होते.

ना.वि. कुलकर्णी यांनी लिहिलेली नाटके

  • उदयकाल
  • सं. संत कान्होपात्रा
  • डाव जिंकला
  • सं. नवीन कल्पना
  • पार्थ प्रतिज्ञा
  • मंगल भुवन
  • माईसाहेब
  • क्षमेची क्षमा

ना.वि. कुलकर्णी यांची अन्य पुस्तके

  • कष्टी वडील
  • कसे दिवस जातील
  • कौटुंबिक गोष्टी
  • ग्रहणापूर्वी सुटका
  • तिकडची शोभा
  • निर्माल्य
  • न्याय?
  • पैसा
  • महाराष्ट्र कुटुंब माला (संपादित)
  • माझ्या गोष्टी
  • माणिक
  • मातृसेवा
  • शिपाई


संमेलनाध्यक्षपद

ना.वि. कुलकर्णी यांच्या रंगभूमीवरील केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना सांगली येथे इ.स. १९४३मध्ये झालेल्या ३३व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!