धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे हा इ.स. २०२२ मधील एक मराठी चित्रपट असून याची निर्मिती मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्टस् आणि झी स्टुडिओज यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे.[२]
पार्श्वभूमी
या चित्रपटाची घोषणा २७ जानेवारी २०२२ रोजी शिवसेना नेते आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत करण्यात आली. हा चित्रपट शिवसेना नेते स्व. आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेला असून मराठी चित्रपट अभिनेते प्रसाद ओक हे दिघे यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात प्रसाद ओक, क्षितीश दाते, मकरंद पाध्ये आणि श्रुती मराठे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १३ मे २०२२ रोजी भारतीय चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. पहिल्या आठवड्यात चित्रपटाने ₹१३.८७ कोटी कमावले आणि ब्लॉकबस्टर हिट ठरला.[३][४] दिघे वापरत असलेली 'एमएच ०५ - जी - २०१३' क्रमांकाची आर्माडा गाडी ही या चित्रपटात वापरण्यात आली आहे हे या चित्रपटाचे एक वैशिष्ट्य आहे.[५]
कथानक
या चित्रपटात आनंद दिघे यांची कथा दाखवण्यात आहे जे शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि ठाणे जिल्हा प्रमुख होते. दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या जीवनावरील हा चरित्रपट असून त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे पैलू त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी कथन केलेल्या विविध कथा आणि घटनांद्वारे या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत.
गाणी
१. |
"गुरुपौर्णिमा" | मनीष राजगिरे |
७:०२ |
२. |
"ढाण्या वाघ" | शाहीर नंदेश |
५:४४ |
३. |
"अष्टमी" | आदर्श शिंदे |
६:३८ |
४. |
"धर्मवीर विषय-संगीत" | मनीष राजगिरे |
२:०९ |
५. |
"आनंद हरपला" | सौरभ साळुंके |
५:३८ |
एकूण अवधी: |
२७:३९ |
कलाकार
पुरस्कार
पुरस्कार
|
वर्ष
|
श्रेणी
|
विजेते
|
निकाल
|
संदर्भ
|
फक्त मराठी सिने सन्मान
|
प्रथम फक्त मराठी सिने सन्मान
|
सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फक्त मराठी सिने सन्मान
|
झी स्टुडिओ
|
विजयी
|
[६][७][८]
|
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - फक्त मराठी सिने सन्मान
|
प्रवीण तरडे
|
विजयी
|
सर्वोत्कृष्ट कथा - फक्त मराठी सिने सन्मान
|
नामांकन
|
सर्वोत्कृष्ट पटकथा - फक्त मराठी सिने सन्मान
|
नामांकन
|
सर्वोत्कृष्ट संवाद - फक्त मराठी सिने सन्मान
|
विजयी
|
मुख्य भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेता - सर्वोत्कृष्ट फक्त मराठी सिने सन्मान
|
प्रसाद ओक
|
विजयी
|
सहाय्यक भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेता - फक्त मराठी सिने सन्मान
|
क्षितिश दाते
|
नामांकन
|
मुख्य भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - फक्त मराठी सिने सन्मान
|
स्नेहल तरडे
|
नामांकन
|
सर्वोत्कृष्ट गायक - फक्त मराठी सिने सन्मान]
|
आदर्श शिंदे
|
विजयी
|
सर्वोत्कृष्ट संगीतकार - फक्त मराठी सिने सन्मान
|
|
नामांकन
|
सर्वोत्कृष्ट गीत- फक्त मराठी सिने सन्मान
|
मंगेश कांगणे
|
विजयी
|
संदर्भ
बाह्य दुवे