द्रव हे पदार्थाच्या चार मूलभूत अवस्थांपैकी एक आहे (इतर म्हणजे ठोस, वायू आणि प्लाझ्मा). द्रव ही अशी स्थिती आहे की ज्या मध्ये पदार्थाच्या कणांना मुक्तपणे फिरता येते, आणि हा पदार्थ त्याच्या कंटेनरच्या आकाराशी सुसंगत असतो.
पाणी हे द्रवाचे उदाहरण आहे.
वायूच्या कणांना एकमेकांबद्दल जराही आकर्षण वाटत नाही म्हणून वायूचे कण एकमेकांपासून दूर जातात. वायूच्या कणांवर दाब देऊन त्यांना जवळ आणले आणि कुठूनही भांड्याबाहेर पडू दिलं नाही तर एका ठराविक परिस्थितीत, हे खूप जवळ आलेले वायूचे कण एकमेकांकडे आकर्षित होतात. हे घडत असतांना तिथलं तापमान कमी होत जाते. एका विशिष्ट तापमानाला आणि दाबाला वायूचे द्रवात रूपांतर होते. खूप दाबामुळे, जबरदस्तीने द्रवरूपात गेलेल्या वायूवरचा दाब कमी झाला तर त्याचे परत वायूत रूपांतर होते.
द्रव आणि वायू दोघांकडे प्रवाह करण्याची क्षमता असते म्हणून, त्यांना फ्लुईड म्हणतात.
द्रव मोजमापे