भारतात सध्या सुमारे १००० ते ३००० तरस आहेत. तरी तरसांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
प्रजनन (Reproduction)- याच्या मिलन व विणीबद्दल फार कमी माहिती आहे. हिवाळा याचा मिलनऋतू असतो. पिलांचा जन्म उन्हाळ्यात होतो. तरसाला एका वेळेस तीन ते चार पिलं होतात. पिलांचे डोळे जन्मत: बंद असतात. पिलं लहान असतानादेखील त्यांच्या अंगावर आडवे पट्टे असतात. शरीरावर पांढरट मऊ केस असतात. परंतु मानेवर पूर्ण वाढलेल्या तरसासारखे आयाळीचे केस नसतात.
वैशिष्ट्ये-मजबूत जबडा, इतर शिकारी प्राण्यांनी केलेल्या शिकारीवर गुजराण करतो म्हणजे थोडक्यात गिधाड या पक्षासारखे सफाईचे काम करतो