जिहादी जॉन

जिहादी जॉन उर्फ महंमद इमवाझी उर्फ अबू मुहारिब अल मुहाजिर हा आयसिसचा प्रमुख दहशतवादी होता. तो उत्तम इंग्लिश बोलत असे. तो आपला चेहरा नेहमी झाकलेला ठेवत असे व अनेक ओलिसांना मारल्याच्या व्हिडिओत तो नखशिखांत काळ्या कपड्यांत दिसला आहे, त्याचे डोळे व आवाज तसेच चाकू हातात धरण्याची पद्धत ही वेगळी वैशिष्ट्ये होती.

जिहादी जॉन हा मूळचा ईशान्य अरबस्तानातला होता. तो तरुण वयात परिवारासह लंडनला आला, तेथे त्याने मूलतत्त्ववादी प्रशिक्षण सुरू केले. नंतर २००९ मध्ये तो टांझानियाला गेला. पूर्व आफ्रिकेतील देशांत तो सफारीवरही गेला होता पण तेथे त्याला पकडण्यात आले. ब्रिटनमध्ये त्याला २०१० मध्ये दहशतवाद विरोधी पथकाने पकडले. सुटका झाल्यावर तो २०१२ मध्ये सीरियात गेला व आयसिसमध्ये सामील झाला. नंतर त्याने लोकांचे अपहरण करून त्यांचे शिरच्छेद केले व त्याची चित्रणे जाहीर केली. त्यामुळे जिहादी जॉनने नाव घेतले की म्हणजे लोकांच्या मनात धडकी भरत असे. २०१४ मध्ये तो जेम्स फोली या अमेरिकी पत्रकाराला धमकावतानाची पहिली चित्रफीत आली होती. फोलीचा त्याने शिरच्छेद केला होता. अमेरिकी पत्रकार स्टीव्हन सॉटलॉफ, ब्रिटिश कार्यकर्ता डेव्हिड हेन्स, अलन हेनिंग, अमेरिका कार्यकर्ता अब्दुल रहमान कासीग व जपानी पत्रकार केन्जी गोटो यांचा शिरच्छेदही जॉननेच केला होता.

अमेरिकेने नोव्हेंबर २०१५मध्ये सीरियातील रक्का येथे केलेल्या ड्रोन हल्ल्यात जिहादी जॉन ठार झाला.

हे सुद्धा पहा

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!