बायडेन उच्चशिक्षित असून त्यांनी डेलावेर विद्यापीठातून इंग्लिशमध्ये पदवी, शिक्षणात पदव्युत्तर पदवी आणि वेस्ट चेस्टर युनिव्हर्सिटी आणि व्हिलानोव्हा विद्यापीठातून इंग्लिशमध्ये पदव्युत्तर पदव्या मिळवल्या आहेत. यानंतर त्या शिक्षणातील पी.एचडी. पदवीसाठी डेलावेर विद्यापीठात परतल्या आहे. त्यांनी तेरा वर्षे हायस्कूलमध्ये (इयत्ता ९-१२) इंग्लिश आणि वाचन शिकवले. याशिवाय मनोरुग्णालयातील भावनिक अपंगत्व असलेल्या किशोरवयीन मुलांना त्यांनी शिकवले. त्यानंतर त्या पंधरा वर्षे,ती डेलावेर टेक्निकल अँड कम्युनिटी कॉलेजमध्ये इंग्लिश आणि लेखन प्रशिक्षक होत्या.
पूर्वजीवन
जिल ट्रेसी जेकब्स यांचा जन्म ३ जून, १९५१ रोजी [a]हॅमन्टन, न्यू जर्सी येथे झाला. [२] त्या पाच बहिणींमध्ये सर्वात मोठ्या आहेत. [३] तिचे वडील, डोनाल्ड कार्ल जेकब्स, [४] दुसऱ्या महायुद्धात अमेरिकन आरमारात सिग्नलमन होते. नंतर त्यांनी बँकांमध्ये काम केले. [३] त्यांचे कुटुंब सिसिलीमधून अमेरिकेत आले होते. त्यांचे मूळ आडनाव ज्याकोपो होते[b][१२] जिल बायडेनच्या आई बॉनी जीन (गॉडफ्रे) जेकब्स [१३] गृहिणी [४] होत्या. [१४] जेकब्स कुटुंब जिल ८ वर्षांची असताना हॅटबोरो, पेनसिल्व्हेनिया येथून माहवाह, न्यू जर्सी येथे स्थलांतरित झाले.[१५]
लहानपणी, ती आणि तिचे कुटुंब हॅटबोरो, पेनसिल्व्हेनिया येथे राहत होते आणि ती आठ वर्षांची असताना माहवाह, न्यू जर्सी येथे स्थलांतरित झाली. डॉनल्ड जेकब्स येथे अनेक बँक आणि वित्तसंस्थांचे अधिकारी होे.[१६][१७][१६] जिलचे आई आणि वडील स्वतःला निधर्मी वास्तववादी समजत असत.ते जरी चर्चमध्ये जात नसले तरीही जिल आपल्या आई बरोबर अनेकदा रविवारी जात असे.[१८]
जिल वयाच्या १५व्या वर्षांपासून काम करते आहे.तिने न्यू जर्सीच्या ओशन सिटीमध्ये होटेलमध्ये वेटरचे काम करण्यापासून [१९][२०][२१][२०] मॉडेलिंग पर्यंत अनेक कामे केली आहेत. जिल स्वतः काहीशी बंडखोर आणि खोडकर असल्याचे कबूल करते. [२२][१९]
जिलने डेलावेर विद्यापीठाच्या [३०] कला आणि विज्ञान महाविद्यालयात इंग्लिश शिकण्यासाठी प्रवेश घेतला. [३१][३२] मध्यंतरी तिने कॉलेजमधून एक वर्षाची सुट्टी घेउन विल्मिंग्टनमधील स्थानिक कंपनीमध्ये मॉडेलिंग केले. [३२] १९७४मध्ये ती आणि स्टीवन्सन वेगळे झाले [३३][३४]
यानंतर तिची ओळख ज्यो बायडेनशी झाली. अनेकवेळा त्यांनी जिलला लग्न करण्याची मागणी घातली परंतु तिने नकार दिला. यामागे ज्योच्या पहिल्या लग्नापासूनच्या दोन मुलांना वाढविणे आणि ज्योच्या सार्वजनिक जीवनामुळे तिच्यावर येणारा प्रकाशझोत ही कारणे होती.[३५][३६]
२००९मध्ये ओबामा-बायडेन अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष निवडणूक जिंकल्यावर बायडेन कुटुंब वॉशिंग्टन, डी.सी.मधील अधिकृत निवासस्थानात रहायला लागले. [३८] जिल बायडेनने आपली शिक्षिकेची कारकीर्द जपत जानेवारी २००९ मध्ये, तिने नॉर्दर्न व्हर्जिनिया कम्युनिटी कॉलेज (NOVA)च्या अलेक्झांड्रिया आवारात सहायक प्राध्यापक म्हणून प्रारंभिक नियुक्तीसह दोन इंग्रजी अभ्यासक्रम शिकवण्यास सुरुवात केली. [३९][४०] अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांच्या जोडीदाराने असे नोकरी करण्याची ही पहिलीच वेळ होय. [४१][३८][३९][४२]
अमेरिकेची प्रथम महिला (२०२१-)
२० जानेवारी, २०२१ रोजी ज्यो बायडेनने राष्ट्राध्यक्षपदाचा भार स्वीकारल्यावर जिल बायडेन अमेरिकेच्या प्रथम महिला झाल्या. [४३]अमेरिकेच्या द्वितीय महिला आणि प्रथम महिलापदी असणाऱ्या बार्बरा बुश यांच्यानंतर जिल बायडेन दुसऱ्या होय. जिल बायडेन पहिल्या इटालियन वंशाच्या प्रथम महिला आहेत. [४४][४५]
^The family name of Giacoppo was subsequently misspelled as Giacoppa at the Ellis Island registry.[५] Accordingly Italian sources tend to refer to the Giacoppo spelling,[६][७] while some American sources refer to a Giacoppa spelling.[८][९][१०] Still another earlier spelling is Giacobbo; the head of the family at the time of immigration was recorded in Italy as Placido Giacobbo.[११]
^In addition to local bands, musical artists who performed at the Stone Balloon during this period included a 1974, pre-Born to Run-fame Bruce Springsteen[२९] as well as Chubby Checker and Tiny Tim. However the bulk of the Stone Balloon's prominence as a venue for up-and-coming major artists occurred after Stevenson's marriage with Jill ended.
संदर्भ
^"Dr. Jill Biden: First Lady". White House. August 6, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. August 6, 2022 रोजी पाहिले. Jill Tracy Jacobs Biden was born on June 3, 1951, in Hammonton, New Jersey, to Bonny Jean Godfrey Jacobs and Donald Carl Jacobs. ...
^Stoltz, Marsha A. (March 15, 2021). "First lady Jill Biden is a South Jersey native – but she also has roots in Mahwah". The Record. Bergen County, New Jersey. March 16, 2021 रोजी पाहिले. You won't find it mentioned in her Wikipedia biography, but 8-year-old Jill Jacobs' arrival at Betsy Ross Elementary School is carefully preserved in its 1959 attendance records, in teacher Harriett Cook's perfect handwriting, which show her moving from Hatboro. The Jacobs family moved to Miller Road in Mahwah, which they called home from about 1959 to 1961. While living there, Donald Jacobs served as CEO of the Mahwah Savings and Loan Association.
^ abStoltz, Marsha A. (March 15, 2021). "First lady Jill Biden is a South Jersey native – but she also has roots in Mahwah". The Record. Bergen County, New Jersey. March 16, 2021 रोजी पाहिले. You won't find it mentioned in her Wikipedia biography, but 8-year-old Jill Jacobs' arrival at Betsy Ross Elementary School is carefully preserved in its 1959 attendance records, in teacher Harriett Cook's perfect handwriting, which show her moving from Hatboro. The Jacobs family moved to Miller Road in Mahwah, which they called home from about 1959 to 1961. While living there, Donald Jacobs served as CEO of the Mahwah Savings and Loan Association.