चिमाजी अप्पा


bhimaji अप्पा
चित्र:Chimaji Appa mrathajpg
पुण्यातील पर्वतीवरील पेशवे स्मारक येथे असलेले चिमाजी अप्पा यांचे चित्र
पूर्ण नाव चिमाजी बाळाजी भट
जन्म इ.स. १७०७
मृत्यू 17 डिसेंबर इ.स. १७४०
' सदाशिवरावभाऊ
उत्तराधिकारी सदाशिवराव भाऊ
वडील बाळाजी विश्वनाथ
आई राधाबाई
पत्नी रखमाबाई, अन्नपूर्णा

अनंत बाळाजी भट तथा चिमाजी अप्पा ऊर्फ चिमणाजी अप्पा (इ.स. १७०७ - १७ डिसेंबर, इ.स. १७४०) हे पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचे पुत्र व बाजीराव पेशव्यांचे धाकटे भाऊ होते. त्यांनी महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी पोर्तुगीज वर्चस्वातून मुक्त करण्यासाठी यशस्वी मोहीम राबवली. त्यांनी २ वर्ष झुंज देऊन वसईचा किल्ला जिंकला व साष्टी बेटांवर मराठ्यांची सत्ता स्थापली. आजच्या मुंबई भागातील मराठ्यांची ही पहिली सरशी होय.

पौष शुक्ल पक्ष दशमी, शके १६६२ म्हणजे १७ डिसेंबर, १७४० रोजी चिमाजी अप्पांचे निधन झाले. सदाशिवराव भाऊ हे त्यांचे पुत्र होत.

पोर्तुगीजांच्या घंटा

२३ मे, १७३९ रोजी चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी वसईची लढाई जिंकून पोर्तुगीजांचे त्या परिसरातील वर्चस्व नष्ट केले. यामुळे चिमाजी स्थानिक जनतेत लोकप्रिय आहेत. या मोहिमेवरून आणलेल्या पोर्तुगीज घडणीच्या भल्याथोरल्या पितळी घंटा आजही महाराष्ट्रात जागोजागी पाहायला मिळतात. नाशिकची नारोशंकराची घंटा ही त्यातलीच एक होय. ही घंटा मराठी भाषेत वाक्प्रचाराच्या रूपात राहिली आहे. महेश तेंडुलकर यांनी या घंटांचा इतिहास हिंदू देवालयांतील पोर्तुगीज घंटा’' २००८ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकात लिहिला आहे.

बाजीराव आणि चिमाजी अप्पा

थोरले बंधू बाजीराव पेशवे यांच्या झगमगत्या कारकिर्दीत चिमाजीआप्पांनी सदैव त्यांना सावलीसारखी साथ दिली. या जोडीचा निर्देश काही वेळा ‘राम-लक्ष्मण’ असा केला जातो, अर्थात लक्ष्मण हा कितीही गुणी व कर्तृत्त्ववान असला तरी रामाच्या कर्तृत्त्वापुढे त्याचे कर्तृत्त्व काहीसे झाकोळून जाते, तसेच चिमाजींबाबत घडले आहे. धोरण आणि अंमलबजावणी याबाबतींतील मुख्य कर्ताकरविता आणि योजक महापुरुष बाजीराव पेशवाच होता आणि चिमाजी हा त्याबाबतची योग्य समज असलेला निष्ठावंत बंधू व सखा होता. मराठ्यांच्या राजकारणाला उत्तराभिमुख बनवून मराठा साम्राज्यविस्ताराला चालना देण्यात बाजीराव पेशव्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते आणि चिमाजींचे सारे जीवितकार्य त्याला पूरक होते. आपल्या बंधूंप्रमाणेच राजकारण आणि रणकारण यांचा उत्तम मेळ त्यांनी साधला.

स्मारक

  • वसईच्या किल्ल्यात चिमाजी अप्पा यांचे अश्वारूढ पुतळ्याच्या रूपात एक स्मारक आहे.
  • जंजिरे धारावी किल्ल्यात चिमाजी अप्पा यांचे अश्वारूढ पुतळ्याच्या रूपात एक स्मारक आहे*.

चिमाजी अप्पांची चरित्रे

  • कृ.वा. पुरंदरे (१९४८)
  • सु.ह. जोशी (१९९३)
  • मराठ्यांच्या इतिहासातील चिमाजी आप्पांचे योगदान (प्रबंध आणि ग्रंथ - डॉ. आर.एच. कांबळे, २०१६)

पुरस्कार

  • पुण्याची ओंकारेश्वर देवस्थान ही संस्था (दरवर्षी) ’श्रीमंत चिमाजी अप्पा पेशवे पुरस्कार’ देते. २०१५ सालाचा पुरस्कार १९-१-२०१६ रोजी दिवंगत (शहीद) कर्नल संतोष महाडिक यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला.
    चिमाजी अप्पा यांची ओंकारेश्वर मंदिर येथील समाधी


Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!