ग्रँड प्रेरी स्टेडियम (पूर्वी क्विकट्रिप पार्क आणि ग्रँड प्रेरीमधील द बॉलपार्क) हे ग्रँड प्रेरी, टेक्सासमधील एक क्रिकेट मैदान आणि याआधीचे बॉलपार्क (बेस बॉल खेळाचे मैदान) आहे. मे २००८ पासून वापरात असलेले हे मैदान २००८ ते २०१९ पर्यंत अमेरिकन असोसिएशन ऑफ प्रोफेशनल बेसबॉलच्या टेक्सास एअरहॉग्जचे आणि २०१७ ते २०१९ पर्यंत युएसएल लीग टू सॉकर संघ टेक्सास युनायटेडचे घरचे मैदान होते.
ऑक्टोबर २०२० मध्ये एअरहॉग्जचा गाशा गुंडाळल्यानंतर, अशी घोषणा करण्यात आली की अमेरिकन क्रिकेट एंटरप्रायझेस - यूएसए क्रिकेटचे व्यावसायिक भागीदार — ने एअरहॉग्ज स्टेडियमचे भाडेपट्टीवर अधिग्रहण केले आहे आणि बॉलपार्कचा क्रिकेट मैदान म्हणून पुनर्विकास करण्याची योजना आखली. $२० दशलक्ष पुनर्विकासाची सुरुवात एप्रिल २०२२ मध्ये झाली, त्यानंतर या स्टेडियमने देशांतर्गत ट्वेंटी२० लीग मेजर लीग क्रिकेटमध्ये टेक्सास सुपर किंग्जचे आयोजन केले. हे स्टेडियम युनायटेड स्टेट्स राष्ट्रीय संघासाठी घर आणि प्रशिक्षण सुविधा म्हणून देखील काम करते.