गॉर्डन गूडी (१२ ऑगस्ट, १९८७ - ) हा स्कॉटलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.सध्या तो स्कॉटलंड लीगच्या माझर्स ग्रेंज सीसी तसेच स्कॉटलंडच्या राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी खेळतो. गूडीने जुलै २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय (एकदिवसीय) सामन्यात आपले पदार्पण केले आणि फेब्रुवारी २०१० मध्ये त्याने पहिला ट्वेन्टी-२० सामना खेळला. डिसेंबर २००८ मध्ये, गूडी हा क्रिकेट स्कॉटलंडशी करार करणाऱ्या पहिल्या तीन खेळाडूंपैकी एक होता कारण तेथील बोर्डाने व्यावसायिकता वाढविण्यावर भर दिला.[ संदर्भ हवा ]