गुस्तावो दियाझ ओर्दाझ आंतरराष्ट्रीय विमानतळ

गुस्तावो दियाझ ओर्दाझ आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: PVRआप्रविको: MMPR) हा मेक्सिकोच्या पोर्तो व्हायार्ता शहरातील विमानतळ आहे. या विमानतळाचा उपयोग मुख्यत्वे पर्यटकांसाठी होतो. येथील बव्हंश वाहतूक हिवाळा, वसंत आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीस होते. त्यानंतर होणाऱ्या पावसामुळे येथील पर्यटन तसेच उड्डाणेही कमी होतात.

येथून उत्तर अमेरिकेतील मोठ्या शहरांना तसेच युरोपमधील निवडक शहरांना थेट सेवा उपलब्ध आहे. २०१६मध्ये ४०,६३,००० प्रवाशांनी या विमानतळाचा उपयोग केला होता.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!