या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो.
गुरू पौर्णिमा हा भारतीय परंपरेत एक विशेष दिवस मानला जातो.आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीला गुरू पौर्णिमा साजरी केली जाते.[१]गुरुपौर्णिमेचा सण भारत, नेपाळ आणि भूतानमध्ये हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मीयांद्वारे साजरा केला जातो. गुरुपौर्णिमा ही पारंपारिकपणे एखाद्याच्या निवडलेल्या आध्यात्मिक शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी साजरी केली जाते.गुरू पूजन करण्यासाठी
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः, गुरुर्देवो महेश्वरः। गुरुर्साक्षात परब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नमः।।
या पारंपरिक श्लोकाचा उच्चार करण्याची पद्धती प्रचलित आहे. याच दिवसाला व्यास पौर्णिमा असेही संबोधिले जाते.
गुरू संकल्पना
वैदिक परंपरेत व्यक्तीपूजन, ग्रंथपूजन नाही तर तत्वांचे पूजन आणि तत्वांचे पालन यांना महत्त्व दिले आहे.[२] गुरू म्हणजे एखाद्या व्यक्तीपेक्षा अधिक ज्ञानी, तापसी, आदरणीय अवस्था असते. गुरू ही कदाचित एखादी व्यक्ती, प्रतिमा, पुतळा असे काहीही असू शकते.
व्यास महात्म्य
महर्षी व्यास हे भारतीय ज्ञान परंपरेत आदरणीय मानले जातात कारण त्यांनी महाभारत ग्रंथाची रचना केली. त्यांचा जन्म बेटावर झाला असल्याने त्यांना दवैपायन असे संबोधिले जाते.[३]
व्यास : उच्छिष्टं जगत् सर्वम् || असे म्हंटले जाते कारण त्यांनी वेदांची रचना केलेली आहे. त्यांनी स्पर्श केलेला नाही असा कोणताही विषय नसल्याने त्यांना भारतीय परंपरेत गुरू स्थानी मान दिला जातो.[४]
बौद्ध धर्मातील महत्व
आध्यात्मिक साधनेने बोधी प्राप्त झाल्यानंतर गौतम बुद्धाने सारनाथ येथे आपल्या शिष्यांना पहिले प्रवचन दिले. तो दिवस गुरू पौर्णिमेचा होता असे मानले जाते त्यामुळे बौद्ध धर्मात या दिवसाला विशेष महत्व आहे.[५]
अन्य
व्यासपूजन करण्याच्या जोडीने व्यक्तीला जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या विविध गुरुजनांचे पूजन यादिवशी केले जाते.[६][७] शाळा, महाविद्यालयातले शिक्षक, आध्यात्मिक गुरू, कला-विद्या यात मार्गदर्शन करणारे शिक्षक यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते.[८]