केशवराव आंधळे (६ एप्रील १९५३) हे मराठी, भारतीय राजकारणी आहेत. केशव आंधळेच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात बीड जिल्ह्यातील चौसाळामधून झाली. २००४ सालच्या अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव करून ऊसतोड मजुरांचे नेते केशवराव आंधळे यांना विजय मिळाला होता.