केतू (ऊर्फ कालाग्नि) (इंग्रजी: Cauda Draconis, or Dragon's Tail or Catabibazon - ☋ ) हा पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कक्षेची पातळी व चंद्रकक्षेची पातळी यांच्या दोन छेदनबिंदूंपैकी एक आहे. चंद्रकक्षेचे प्रतल पृथ्वीकक्षेच्या प्रतलात ज्या छेदन बिंदूपाशी दक्षिणेस असते तो बिंदू केतू होय. (संस्कृत: केतु, IAST: Ketú) (☋) हे वैदिक किंवा हिंदू ज्योतिषशास्त्रातील उतरत्या (म्हणजे 'दक्षिण') चंद्राची पातबिंदू (नोड)[४] आहे.[५][६]देवता म्हणून ओळखले जाणारे, राहू आणि केतू हे अमर असुर (राक्षस) स्वरभानु दोन भाग मानले जातात, ज्याचा देव विष्णूने शिरच्छेद केला होता.[७]
ज्योतिषशास्त्र
राहु व केतु यांना ज्योतिषशास्त्रात छायाग्रह म्हणतात. हे दोन्ही ग्रह एकाचही राक्षसाच्या शरीरातून जन्मले आहेत, अशी कल्पना आहे. सूर्याने व चंद्राने तक्रार केल्यामुळे भगवान विष्णूने आपले सुदर्शन चक्र फेकून या राक्षसाचे धड व शरीर वेगळे केले. राक्षसाच्या डोक्याकडच्या भागाला राहू म्हणतात, तर धडाच्या भागाला केतू. राहू-केतूंच्या चित्रांत हे स्पष्टपणे कळते. केतूने एका हातात गदा व दुसऱ्या हातात वरमुद्रा धारण केलेली दिसते. गिधाड हे त्याचे वाहन आहे.
राहूप्रमाणेच केतूही सूर्याभोवती इतर ग्रहांच्या भ्रमणदिशेच्या विरुद्ध दिशेने फिरतो. (घड्याळ्याचे काटे फिरण्याच्या विरुद्ध दिशेने). ज्योतिषाच्या भाषेत हा सदैव वक्री असतो.[ संदर्भ हवा ] (संदर्भाची गरज नाही!!) केतू हा पृथ्वीच्या भ्रमणमार्गावरील एक बिंदू आहे. त्या बिंदूला सूर्यप्रदक्षिणा करण्यास १८ वर्षे ७ महिने २ दिवस इतका काळ लागतो. पृथ्वीला फक्त एक वर्ष. म्हणजे पृथ्वीच्या दृष्टीने केतू जवळजवळ स्थिर आहे. जेव्हा पृथ्वी सरकत सरकत केतूजवळ येते तेव्हा पृथ्वीवरून पाहाताना केतू मागेमागे येताना दिसेल. जेव्हा पृथ्वी त्याला ओलांडून पुढे जाईल, तेव्हाही तो मागेमागे पडताना भासेल. म्हणजेच तो सदैव वक्री असेल. साधारण तर्काने हे समजायला हरकत नाही. तेव्हा त्यासाठी संदर्भाची गरज नाही.
जेव्हा केतू (किंवा राहू) बिंदूपाशी सूर्य किंवा चंद्र येतो तेव्हा सूर्य/चंद्र ग्रहण होते. जनसामान्यांच्या भाषेत त्यावेळी सूर्याला किंवा चंद्राला राहू/केतूने गिळलेले असते. ग्रहण केव्हा होते हे समजावून सांगण्यासाठी याहून सोपे स्पष्टीकरण असूच शकत नाही.
भारतीय फलज्योतिषात केतूला ग्रह मानले आहे. कुंडलीमध्ये याचे स्थान महत्त्वाचे आहे.
ज्योतिषाप्रमाणे याची माहिती खालीलप्रमाणे आहे.