कृष्णराव कोल्हापुरे हे दीनानाथ मंगेशकरांच्या बलवंत नाटक कंपनीमध्ये काम करणारे गायक नट होते. ते स्त्रीभूमिकाही करत. त्यांची पत्नी विजया ही दीनानाथ मंगेशकरांची बहीण लागे. कृष्णराव कोल्हापुरे हे नाटकांचे संगीत दिग्दर्शकही होते. ते उत्तम वीणावादक होते आणि बलवंत संगीत मंडळीचे प्रमुख भागीदार होते.
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गुरू पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे हे कृष्णराव कोल्हापुरे यांचे चिरंजीव आणि पद्मिनी कोल्हापुरे ही नात.
बलवंत संगीत मंडळीत कृष्णराव कोल्हापुरे
नाट्यसंगीताच्या क्षेत्रात दीनानाथ मंगेशकरांना अधिकाधिक गती मिळावी, त्यांच्या उपजत गाण्याला शास्त्रीय संगीताचा आवश्यक तो पाया मिळावा म्हणून कृष्णराव कोल्हापुरे यांनी बलवंतच्या बिऱ्हाडी बीनवादक मुरादखॉं, त्यांचा मुलगा निसार हुसेन, भास्करबुवा बखले, रामकृष्णबुवा वझे, गणपतीबुवा भिलवडीकर, उस्ताद अब्दुल करीम खॉं, अल्लादिया खॉं आदींची गाणी केली. त्याचा फायदा झाला.
कृष्णराव कोल्हापुरे यांची भूमिका असलेली नाटके (कंसात भूमिकेचे नाव)
- संगीत उग्रमंगल (दुर्गावती)
- कॉंटो में फूल - भक्त प्रल्हाद (कयाधू)
- संगीत जन्मरहस्य (रघुनाथ)
- संगीत धरम का चॉंद - भक्त ध्रुव (सुनीति)
- संगीत पुण्यप्रभाव (वसुंधरा)
- संगीत भावबंधन (मालती)
- संगीत रणदुंदुभी (सौदामिनी)
- संगीत राजसंन्यास (येसूबाई)
- संगीत वीरविडंबन (सैरंध्री-द्रौपदी)
- संगीत शाकुंतल (कण्व)
- संगीत संन्यस्त खड्ग (गौतमबुद्ध)
- संगीत सुंदोपसुंद (तिलोत्तमा)