काशी विश्वनाथ मंदिर

काशी विश्वनाथ मंदिर

नाव: काशी विश्वेश्वर मंदिर
निर्माता: स्वयंभू
जीर्णोद्धारक: अहिल्याबाई होळकर
निर्माण काल : महाभारतकालीन[]
देवता:
वास्तुकला: हिन्दू
स्थान: उत्तरप्रदेशच्या वाराणसी जिल्ह्यामध्ये


विश्वेश्वर हा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. शंकराचे हे रूप काशीत पूजले जाते. पूर्वी वाराणसी काशी विश्वनाथ मंदिर होते. हे काशीचे मुख्य विश्वनाथ मंदिर क्रूर आक्रमक कुल्बउद्दीन ऐबक याने पाडले. या मंदिराच्या ठिकाणी मशीद उभारली. अनेक वर्षे दुर्लक्षित आणि मुस्लिमांद्वारे प्रतिबंधित राहिल्यावर अकबराच्या काळात तोरडमल या अभिमानी राजाने या मंदिराचे पुनर्निर्माण केले. परंतु क्रूर आणि धर्मांध औरंगजेब याने हे मंदिर परत पाडून टाकले. अनेक शतके तशीच गेल्या नंतर तेथे अहिल्याबाई होळकर यांनी विश्वनाथ मंदिर बांधले. राजा रणजितसिंग या हिंदू देशाभिमानी राजाने त्याच्या मुख्य शिखरावर सोन्याचा मुलामा चढविला होता. परंतु तो मुसलमानांनी लूटमार करून नेला. १६ व्या शतकात येथेच सन्त एकनाथानी " श्रीएकनाथी भागवत" हा वारकरी सम्प्रदायाचा महान ग्रंथ लिहीला. येथे याची हत्तीवरून मिरवनूक निघाली.

आख्यायिका

कैलासावर भस्म फासून रहाणाऱ्या शंकराची सर्व टिंगल करावयाचे म्हणून पार्वतीने 'मला कुणी चिडविणार नाही अश्या ठिकाणी घेऊन चला' अशी विनंती शंकराला केली.त्यामुळे शंकर येथे येउन राहू लागला.तेथे दिवोदास राजाने मंदिर बांधल्यावर ते त्यात रहावयास गेले.[]

मंदिरे

या शहरात सुमारे १६५४ मंदिरे आहेत.त्यामुळे यास मंदिराचे शहर असेही म्हणतात.त्यात प्रमुख मंदिर काशी विश्वेश्वराचे आहे.विश्वनाथाचे दर्शन घेण्याआधी धुंडीराज किंवा ढुंढीराज विनायकाचे दर्शन घेण्याचा येथे प्रघात आहे.या मंदिराचे सभोवताल अष्ट दिशांचे अष्टविनायक आहेत.साक्षी विनायक पश्चिमेला, देहली विनायक उत्तरेला, पापशार्थी विनायक दक्षिणेला, दुर्गा विनायक नैऋत्येला, भीमचंद विनायक वायव्येला, उदंड विनायक आणि ईशान्येला सर्व विनायक.[]

मुख्य मंदिर

काशी विश्वनाथाचे मंदिरात मुख्य पिंडी गाभाऱ्याचे एका टोकाला आहे.त्यावर गंगाजल व बिल्वपत्रे वाहण्यात येतात.ते काळ्या पाषाणाचे व सोन्या-चांदीने मढविले आहे.तेथे दर्शन घ्यावयाचे तर,तीन हार न्यायची पद्धत आहे.एक हार शंकराला,दुसरा पार्वतीला तर तिसरा हार तेथील पूजारी त्या भक्ताचे गळ्यात घालतो.[]

इतर महत्त्वाची मंदिरे

  • अविमुक्तेश्वर मंदिर
  • श्री बिंदूमाधव मंदिर
  • काळभैरव मंदिर
  • कौदेवी मंदिर
  • मनकर्णिका मंदिर
  • पिशाच्च मोचनी मंदिर[]

संदर्भ

  1. ^ a b मुकुंद नानीवडेकर. तरुण भारत,नागपूर,दि. ०८ मार्च २०१४,छोटे उस्ताद पुरवणी,पान क्र. ४, "मथळा: सर्व क्षेत्रांचे आदिपीठ: काशी" Check |दुवा= value (सहाय्य). १५/०३/२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ a b c मुकुंद नानीवडेकर. तरुण भारत,नागपूर,दि. १५ मार्च २०१४,छोटे उस्ताद पुरवणी,पान क्र. ४, "मथळा: मंदिरांचे शहर काशी" Check |दुवा= value (सहाय्य). १५/०३/२०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!