१५६२ कि.ग्रॅ. प्रतिघनमीटर (१.० वा. व -७८.५ °से. ला स्थायू) ७७० कि.ग्रॅ. प्रतिघनमीटर (५६ वा. व २० °से. ला द्रव) १.९७७ कि.ग्रॅ. प्रतिघनमीटर (१.० वा. व ० °से. ला वायू)
गोठणबिंदू
−५६.६ °से; −६९.८ °फॅ; २१६.६ के ५.१ वा. तिहेरी बिंदू
कार्बन डायॉक्साईड (CO2) हा एक वायू आहे. याला मराठीत कर्ब द्वी प्राणीद असे नाव आहे. हा मुख्य हरितवायू असून पृथ्वीच्या सध्याच्या जागतिक तापमानवाढीस जबाबदार वायूंपैकी एक समजला जातो.
कार्बन डायॉक्साईडचे उपयोग
फसफसणारी शीतपेय तयार करण्यासाठी कार्बन डायॉक्साईडचा वापर करतात. त्यात पाण्याचे कार्बोनिक आम्ल तयार होते.
स्थायुरूपातील कार्बन डायॉक्साईड म्हणजे शुष्क बर्फाचा वापर शीतकपाटात पदार्थ थंड करण्यासाठी होतो.
काही अग्निरोधक यंत्रात(fire extinguisher) रासायनिक प्रक्रियेत तयार होणारा वायू हा कार्बन डायऑक्साईड असतो, ज्यामुळे ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊन आग विझण्यास मदत होते.
कॉफीमधून कॅफिन काढून टाकण्यासाठी द्रवरूप कार्बन डायॉक्साईड वापरतात.
प्रकाश संस्लेषण प्रक्रियेत वनस्पती हवेतील कार्बन डायॉक्साईड शोषून घेतात व स्वतःचे अन्न तयार करतात.
कार्बन डायॉक्साईडचा उपयोग युरिया, मिथेनॉल, सेंद्रिय व असेंद्रिय कार्बोनेट तयार करण्यासाठी होतो.
कार्बन डायॉक्साईड व इपोक्साइड यांच्या संयोगाने प्लास्टिक व पॉलिमर तयार केले जातात.
विद्युत उपकरणांची स्वच्छता करण्यासाठी कार्बन डायॉक्साईड वापरले जाते.
तेलप्रक्रिया उद्योगांमध्ये तेलाची घनता व प्राप्ती वाढविण्यासाठी कार्बन डायॉक्साईड वापर केला जातो.